बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हे दोघे चांगलेच चर्चेत असतात. सोशल मीडियावरही ते त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. अनुष्का आणि विराटप्रमाणेच त्यांच्या छोट्या ‘वामिका’चेही सोशल मीडियावर चाहते आहेत. नेटकरी आणि विराट अनुष्काचे चाहते तिची एक झलक बघण्यासाठी आतुर असतात. मध्यंतरी तिचे फोटो व्हायरल झाल्याने विराट आणि अनुष्काने नाराजी व्यक्त केली होती. ते दोघेही त्यांच्या मुलीला या सगळ्यापासून लांब ठेवत असतात.
सध्या विराट आणि अनुष्का उत्तराखंड येथे सुट्टी एंजॉय करत आहेत. त्यांच्या या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल होत आहेत. टी-२० विश्वचषकानंतर विराटला ब्रेकची गरज होती. त्यामुळेच विराट कुटुंबासह उत्तराखंडला रवाना झाला. नुकतंच विराट-अनुष्काने नैनितालच्या ‘कैंची धाम’ला भेट दिली आणि त्यांच्या लाडक्या मुलीसाठी हनुमंताकडे आशीर्वादही मागितले. अनुष्का आणि विराटने त्यांच्या चाहत्यांसह फोटोदेखील काढले.
हे जोडपे नीम करोली बाबा आश्रमातही आशीर्वाद घेण्यासाठी गेले. त्याचबरोबर एका हिल स्टेशनवरील विराट-अनुष्काचे फोटोही व्हायरल होत आहेत. एका छायाचित्रात अनुष्का तिची मुलगी वामिकाला मांडीवर घेतेय. याशिवाय या जोडप्याच्या चाहत्यांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत.
अनुष्का शर्मा झुलन गोस्वामीचा बायोपिक ‘छकडा एक्सप्रेस’ मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘झिरो’ या चित्रपटात अनुष्का शाहरुख खानसोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता.