Virat Kohli & Anushka Sharma : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या दोन्ही मुलांसह प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात दर्शनासाठी पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यावर, विराट-अनुष्काने वृंदावनमधील प्रेमानंद गोविंद शरण महाराजांच्या आश्रमात जाऊन त्यांचं दर्शन घेतलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट-अनुष्काने यापूर्वी देखील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट दिली होती. आश्रमात पोहोचताच सर्वप्रथम या दोघांनी प्रेमानंद महाराजांना नमस्कार केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. प्रेमानंद महाराजांनी सर्वात आधी विराटला विचारलं, “तू आनंदी आहेस का?” यावर कोहलीने मान हलवत ‘हो’ म्हटलं आणि तो हसताना दिसला. यानंतर अनुष्काने त्यांच्याशी संवाद साधला.

हेही वाचा : Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ मेळ्यात होणार सुरांची बरसात; शंकर महादेवन यांसारख्या दिग्गज गायकांसह ‘हे’ मराठी कलाकार सादर करणार परफॉर्मन्स

अनुष्काने प्रेमानंद महाराजांना म्हणाली, “जेव्हा मी मागच्या वेळेला इथे आले होते तेव्हा माझ्या मनात अनेक प्रश्न होते. पण, तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी आधीच ते सगळे प्रश्न विचारले. तुम्ही मला फक्त प्रेम आणि भक्ती द्या.” यावर प्रेमानंद महाराज म्हणाले, “तुम्ही खूप धाडसी आहात कारण, या समाजात एवढा सन्मान मिळाल्यानंतर पुन्हा भक्ती मार्गावर वळणारे फार कमी लोक असतात आणि ते कठीण आहे. मला वाटतं तुमच्या ( अनुष्का ) भक्तीचा त्याच्यावर (विराट) विशेष प्रभाव पडला.” यावर अनुष्का म्हणाली, “भक्तीपेक्षा मोठी दुसरी कोणतीच गोष्ट या जगात नाहीये” तेव्हा प्रेमानंद महाराज हसले आणि म्हणाले, “हो…भक्तीपेक्षा मोठं काहीच नाही. देवावर श्रद्धा ठेवा, त्याचं कायम नाव घ्या आणि भरपूर प्रेम आणि आनंदाने जगा.”

हेही वाचा : Deepika Padukone : “एवढ्या वरिष्ठ पदावरील लोक…”, दीपिकाची L&T अध्यक्षांच्या रविवारी काम करण्याच्या सल्ल्यावर संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत कोहलीला ( Virat Kohli ) चांगली कामगिरी करता आली नाही. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावलं होतं पण, त्यानंतर विराट चांगल्या फॉर्ममध्ये दिसला नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान विराट कोहली ऑफ-स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळताना सलग आठ वेळा बाद झाला. दरम्यान, या सेलिब्रिटी जोडप्याने यापूर्वी २०२३ मध्ये प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट दिली होती.

Story img Loader