देशात नोटबंदी झाली तेव्हा एकच गदारोळ माजला होता. आता नोटांसंदर्भात एक नवी बातमी समोर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असणार असल्याचेही केजरीवालांनी म्हंटले आहे. त्यांच्या या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. संगीतकार विशाल दादलानीने आपले मत यावर नोंदवले आहे.

विशालने ट्विटमध्ये असं लिहलं आहे की ‘भारतीय राज्यघटना सांगते की आपण धर्मनिरपेक्ष समाजवादी प्रजासत्ताक आहोत. त्यामुळे राज्यकारभारात धर्माला स्थान नसावे. मी हे स्पष्टपणे सांगतो की जर एखादी व्यक्ती कोणत्याही धर्माचा कोणताही भाग सरकारच्या पैलूंमध्ये आणत असेल तर त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. जय हिंद’. असा शब्दात त्याने नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला आहे. यावेळी केजरीवालांनी इंडोनेशिया देशाच्या नोटांचा दाखला दिला आहे.

भक्तांना संकटातून तारणार ‘एकविरा आई’! सोनी मराठी वाहिनीवर नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

संगीतकार विशाल नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली मतं व्यक्त करत असतो. करोना काळात त्याने गरजुंची मदत करण्यासाठी देशभरातील अनेक लोकांनी पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये पैसे दान केले होते. या पैशांचा हिशोब बॉलिवूड संगीतकार विशाल दादलानी याने केंद्र सरकारकडे मागितला होता. तसेच चिनी अ‍ॅप्स बॅन करण्यावरदेखील त्याने टीका केली होती.

विशाल मूळचा मुंबईचा आहे. तो स्वतः संगीतकार आणि एक उत्तम गायक आहे. ‘इंडियन आयडॉल’ या कार्यक्रमात तो परीक्षकाच्या भूमिकेत दिसून येतो. त्याने आजवर ‘ओम शांती ओम’, ,चेन्नई एक्सप्रेस,, ‘सुलतान’, ‘विक्रम वेधा’ ‘टायगर जिंदा हैं’ यांसारख्या चित्रपटांना संगीत दिले आहे. शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटासाठी त्याने संगीत दिले आहे.

Story img Loader