तब्बल ४ वर्षांनी शाहरुख खान चित्रपटगृहात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. येत्या बुधवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एकीकडे शाहरुखचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत, तर दुसरीकडे या चित्रपटाला जबरदस्त विरोध होताना दिसत आहे. गाणी आणि त्यातील भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे हा चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला.

बऱ्याच ठिकाणी या चित्रपटाच्या विरोधात बरीच तीव्र निदर्शनं झाली. बऱ्याच हिंदू संघटनांनी या चित्रपटाच्या गाण्यावर आक्षेप घेतला, हा चित्रपट बॉयकॉट करायची देखील जोरदार मागणी होत होती. बऱ्याच राज्यात बजरंग दलकडूनही या चित्रपटाला प्रचंड विरोध झाला, काही ठिकाणी चित्रपटगृह जाळण्याचीसुद्धा धमकी देण्यात आली, पण आता याबद्दलच एक नवीन माहिती समोर येत आहे.

kareena Kapoor video last night from recidence after the incident
Video: पतीवर झालेल्या हल्ल्याने करीना कपूर चिंतेत; घटनेनंतर घराबाहेरील पहिला व्हिडीओ आला समोर
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
ROHIT Pawar
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “प्रसिद्ध अभिनेत्याचं घर सुरक्षित नसेल तर…”
Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab sent mangala movie trailer to Bollywood celebrity on instagram
शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या

आणखी वाचा : शाहरुख खानच्या चाहत्याने दिली धमकी; म्हणाला “मी २५ तारखेला आत्महत्या करणार कारण…”

या चित्रपटाचा विरोध करण्यात अग्रेसर असणाऱ्या ‘विश्व हिंदू परिषद’ आणि ‘बजरंग दल’ या संघटना गुजरातमध्ये या चित्रपटाचा विरोध करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. गुजरातच्या ‘विश्व हिंदू परिषद’चे प्रमुख अशोक रावल यांनी याबद्दल एक अधिकृत वक्तव्य जारी केलं आहे. त्यांनी या चित्रपट बदल सुचवणाऱ्या सेन्सॉर बोर्डाचे कौतुक केले आहे, आणि आता चित्रपट पाहायचा की नाही हे त्यांनी प्रेक्षकांवर सोडायचं ठरवलं आहे.

अशोक रावल म्हणाले, “या चित्रपटाला बजरंग दलाकडून विरोध झाल्यावर सेन्सॉर बोर्डाने यातील अश्लील दृश्य आणि शब्द हटवले आहेत ही खूप चांगली बाब आहे. धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि हिंदू समाजाचे मी अभिनंदंन करतो.” २५ जानेवारीला ‘पठाण’ प्रदर्शित होणार आहे. अडवांस बुकिंगमध्ये या चित्रपटाने रेकॉर्ड तोडायला सुरुवात केली आहे. यात शाहरुखबरोबर दीपिका पदूकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Story img Loader