दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. खासकरून ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर त्यांच्या लोकप्रियतेमध्ये आणखी भर पडली आहे. विवेक हे बॉलिवूडबद्दल आणि एकूणच राजकीय परिस्थितीबद्दल परखडपणे आपली मतं सोशल मीडियावर मांडत असतात. नुकताच त्यांनी अभिनेते प्रकाशराज यांना टोला लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ट्वीटवर प्रकाशराज यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तयांनी बॉयकॉट गॅंग, मोदींचा बायोपिक आणि काश्मीर फाइल्स चित्रपटावर टीका केली आहे. यामुळे आता प्रकाशराज आणि विवेक अग्निहोत्री यांच्यात ट्वीटर वॉर सुरु झाला आहे. प्रकाशराज एक कार्यक्रमात म्हणाले होते, “काश्मीर फाइल्स हा एक वाईट चित्रपट आहे, पण त्याची निर्मिती कोणी केली हे आपल्याला माहीत आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरी त्यांच्यावर थुंकतात आणि चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणतो मला ऑस्कर का मिळत नाही? ऑस्कर काय त्याला भास्करही मिळणार नाही.” यावरून विवेक अग्निहोत्री चांगलेच संतापले आहेत.
“मला त्रास…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम सोडल्यावर ओंकार भोजनेचा खुलासा
विवेक अग्निहोत्री यांनी एका यूजरचे ट्वीट शेअर केलं आहे त्या यूजरनेदेखील प्रकाशराज यांच्यावर टीका केली आहे. विवेक अग्निहोत्रींना त्याच ट्वीटवर लिहले आहे “केवळ २० हजार मत जगातील सर्वात मोठ्या खलनायकाला, आश्चर्य आहे” असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. प्रकाशराज यांनी २०१९ च्या निवडणुकांमध्ये बंगळुरूमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव भाजपाच्या नेत्याने केला होता.
दरम्यान, ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटावरून बराच वाद झाला होता. हा प्रोपगंडा चित्रपट असल्याची टीकाही झाली होती. विवेक अग्निहोत्री सध्या ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटावर काम करत आहेत.