दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे गेले काही दिवस खूप चर्चेत आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’ या त्यांचा चित्रपट मध्यंतरी ऑस्करच्या मुद्द्यावरून चर्चेत आला होता. २०२२ मधील बहुचर्चित चित्रपटांच्या यादीमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सामील आहे. १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि त्यावेळी घडलेली परिस्थिती या चित्रपटाद्वारे सांगण्यात आली. त्यानंतर ते कोणता नवीन चित्रपट घेऊन येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. आता त्यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे फार चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘दिल्ली फाइल्स’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. गेले काही महिन्यांपासून ते या चित्रपटावर काम करत आहेत. अशातच त्यांनी आता एक नवा विषय हाताळणार असल्याचे सांगितले आहे. आज त्यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
हेही वाचा : “करोना महामारीमुळे बॉलिवूड माफिया…” प्रकाश राज यांनी सांगितली हिंदी चित्रपटसृष्टीची दुसरी बाजू
विवेक यांची पत्नी पल्लवी जोशी हिने दोन दिवसांपूर्वी एक पोस्टर शेअर करत या चित्रपटाचं योग्य नाव ओळखायला सांगितलं होतं. या पोस्टरमध्ये विवेक अग्निहोत्री यांचा आगामी चित्रपट ‘द __ वॉर’ असं लिहिण्यात आलं होतं. हे पोस्टर शेअर करताना पल्लवीने चाहत्यांना अचूक नाव ओळखून ते कॉमेंटमध्ये लिहिण्यास सांगितलं. अनेकांनी करोना काळाशी संबंधित हा चित्रपट असेल असा अंदाज वर्तवला होता. आता खुद्द विवेक अग्निहोत्री यांनीच हे कोडं उलगडलं आहे. त्यांनी या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत नाव जाहीर केलं आहे. ‘द वॅक्सिन वॉर’ असं या चित्रपटाचे नाव आहे. हे पोस्टर शेअर करताना त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.
हेही वाचा : ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘पुष्पा’च्या दिग्दर्शकांनी एकत्र येत प्रेक्षकांना दिली खास भेट, ट्वीट करत म्हणाले…
देशात कोविड काळात कशाप्रकारे वॅक्सिन तयार करण्यात आली, ती गोष्ट विवेक अग्निहोत्री या चित्रपटाच्या माध्यमातून मांडणार आहेत. ही कथा सत्य घटनेवर आधारित असणार आहे. विवेक अग्निहोत्री लवकरच या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु करणार आहेत. या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे ,४-५ नव्हे तर ११ भारतीय भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.