चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांचा द व्हॅक्सीन वॉर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. नाना पाटेकरांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नाही. या अगोदर विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट चांगलाच गाजला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई करत विक्रम रचला होता. द कश्मीर फाईल्स’च्या यशानंतर विवेक अग्निहोत्री लवकरच नवा चित्रपट घेऊन येणार आहे.
विवेक अग्निहोत्रींनी ट्वीटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ही घोषणा केली आहे. पर्व: एन एपिक टेल ऑफ धर्म असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट एसएल भैरप्पा यांच्या ‘पर्व’ या पुस्तकावर आधारित आहे. हा चित्रपट तीन भागात बनण्यात येणार असून या चित्रपटाच्या माध्यमातून महाभारतावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.
नुकताच विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला नर्गिस दत्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनुपम खेर, मिथनू चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.