द कश्मीर फाईल्स’ या वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित झाला होता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आणि करोनाच्या साथीनंतर अशी कामगिरी करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. काहींनी या चित्रपटाचं कौतुक केलं होतं तर काहींनी यावर टीकाही केली होती.
आता या चित्रपटाचा अजून एक भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. अनेक नरसंहार नाकारणारे, दहशतवादी समर्थक आणि भारताच्या शत्रूंनी काश्मीर फाइल्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता तुमच्यासमोर काश्मीर हिंदूंच्या नरसंहाराचे असभ्य सत्य आणत आहे ज्यावर फक्त एक शैतानच प्रश्न करू शकतो. ‘रडायला तयार राहा’ असं म्हणत अग्निहोत्री यांनी चित्रपटाचा एक छोटासा टीझरही प्रदर्शित केला आहे. त्यामुळे या पुढच्या भागातून नक्की काय पाहायला मिळणार याबाबत चाहत्यांना उत्सुक्ता लागली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले होते. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक यांनी मुख्य भूमिका साकारली होती.