‘काश्मीर फाईल्स’, ‘वॅक्सिन वॉर’ आणि ‘ताश्कंद फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री बऱ्याच गोष्टींवर व्यक्त होत आपलं स्पष्ट मत मांडतात. आपल्या स्वतःच्या सिनेमांवर कोणी टीका केल्यास बाजू मांडताना किंवा कुठल्याही गोष्टीवर व्यक्त होत असताना ते एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या आगामी सिनेमातून एका बड्या अभिनेत्याला काढून टाकलं आहे, असं एक्सवर सांगितलं आहे.

कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी एक्स माध्यमावर एक पोस्ट केली होती. यात त्यांनी सिनेसृष्टीतील कास्टिंग डायरेक्टर आणि त्यांचे मॅनेजर्स यांच्यावर टीका केली होती. मुकेश छाब्रा यांच्या याच एक्स सोशल मीडियावरील पोस्टवर विवेक अग्निहोत्री यांनी व्यक्त होत त्यांनी त्यांच्या आगामी सिनेमातून एका मोठ्या अभिनेत्याची हकालपट्टी केल्याचं म्हटलं होतं.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

हेही वाचा……आणि गोविंदाने ‘ते’ गाणं १५ मिनिटांत शूट करून दाखवलं, आयफेल टॉवर समोर परवानगी नसतानाही केलं चित्रीकरण

काय होती मुकेश छाब्रा यांची पोस्ट ?

मुकेश छाब्रा आपल्या ‘एक्स’ सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणतात की, सध्या आपल्या सिनेसृष्टीत एक अभिनेता २०० कास्टिंग डायरेक्टर्स आणि १५,६८० मॅनेजर्स झाले आहेत अशी स्थिती आहे. म्हणजे अभिनेत्यांची संख्या कमी आणि कास्टिंग डायरेक्टर आणि मॅनेजर्सची संख्या प्रचंड वाढली आहे.

काय होता विवेक अग्निहोत्रींचा प्रतिसाद

मुकेश छाब्रा यांनी केलेल्या पोस्टवर व्यक्त होत विवेक अग्निहोत्री म्हणाले की, मला गेल्या आठवड्यात एका मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढून टाकावं लागलं, कारण त्याचा मॅनेजर खूप उद्धट वागत होता. तो एका मोठ्या सेलिब्रिटीच्या स्टार किडच्या टॅलेंट एजन्सीचा कर्मचारी असल्यामुळे त्याला असं वागण्याचा विशेष अधिकार आहे असं त्याला वाटत होतं. या अनेक मॅनेजर्सनी मुलांचे करिअर घडवायचे सोडून ते उद्ध्वस्त केले आहेत. मुकेश, कृपया या सर्व जणांचं वर्कशॉप घेऊन यांना सर्व गोष्टी पुन्हा शिकव.

हेही वाचा…Video : ‘या’ हिंदी चित्रपट निर्मात्याने लिहिली ‘लय भारी’ सिनेमाची कथा; आमिर खानही ऐकून झाला चकित; म्हणाला, “त्याचा चेहरा बघून…”

विवेक यांनी त्यांच्या चित्रपटातून काढून टाकलेल्या कलाकाराचं नाव जाहीर केलं नाही. त्यांनी आधीच घोषणा केली होती की, त्यांचा पुढचा चित्रपट ‘द दिल्ली फाईल्स’ असेल. हा चित्रपट ‘द ताश्कंद फाईल्स’ आणि ‘द काश्मीर फाईल्स’नंतरच्या ट्रायलॉजीचा तिसरा भाग असेल, असे संकेत मिळाले होते. एका पूर्वीच्या मुलाखतीत विवेक यांनी सांगितलं होतं की, त्यांंना बॉलीवूडच्या मोठ्या स्टार्सबरोबर काम करायला आवडत नाही, कारण त्यांच्या मते हे कलाकार “मूर्ख” असतात.

हेही वाचा…Bhool Bhulaiyaa 3 : मंजुलिका पुन्हा आली…! ‘भुल भुलैय्या ३’ मध्ये दिसणार कार्तिक-विद्याची अनोखी जुगलबंदी; टीझर प्रदर्शित

स्टार मूर्ख असतात

‘अनस्क्रिप्टेड’ या पॉडकास्टवर बोलताना विवेक म्हणाले, “हे मी गर्वाने सांगत नाही, पण सत्य सांगतो आहे. मला असं वाटायला लागलं की मी ज्या स्टार्सबरोबर काम करतो, ते शिक्षित नाहीत आणि त्यांना जगाचं काहीच ज्ञान नाही. मी त्यांच्यापेक्षा खूपच हुशार आहे आणि माझा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्यापेक्षा नक्कीच चांगला आहे. हे लोक इतके मूर्ख आहेत की ते तुमचंही काम खराब करतात.” पुढे ते असंही म्हणतात, “बॉलीवूडचे चित्रपट मूर्ख असतात, कारण त्यांचे स्टार्स मूर्ख असतात. हे स्टार्स इतके मूर्ख असतात की ते प्रत्येक दिग्दर्शक आणि लेखकाला मूर्ख बनवतात.”

विवेक अग्निहोत्रींचा शेवटचा चित्रपट ‘द वॅक्सिन वॉर’, ज्यामध्ये नाना पाटेकर मुख्य भूमिकेत होते, तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे.

Story img Loader