शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या या चित्रपटाचं पहिलंच गाणं ‘बेशरम रंग’ प्रदर्शित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या गाण्यात दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद रंगला आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या गाण्यावर प्रतिक्रिया देताना टीका केली. पण तीच टीका आता विवेक यांच्यावर उलटली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या मुलीचे भगव्या बिकिनीमधील फोटोज शेअर करून त्यांना ट्रोल करायला सुरुवात झाली आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्यांनी बॉलिवूड चित्रपटांतून दाखवल्या जाणाऱ्या अश्लीलतेवर ताशेरे ओढले. त्या क्लिपमध्ये एक किशोरवयीन मुलगी गाण्याचे आताच्या पीढीवर होत असलेल्या परिणामांवर चिंता व्यक्त करताना दिसत आहे. या ट्वीटनंतर सोशल मीडियावर त्यांच्याविरुद्ध ट्रोलिंग सुरू झालं आहे.
आणखी वाचा : मलायका अरोरा दुसऱ्यांदा लग्न करण्यास तयार; अर्जुन कपूर नाही तर ‘हे’ आहे त्यामागील कारण
‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार काही लोकांनी विवेक यांची मुलगी मल्लिका अग्निहोत्री हिचे भगव्या रंगातील बिकिनीचे फोटो शेअर करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर ही मुलगी विवेक अग्निहोत्री यांचीच मुलगी असल्याचा काही लोक दावा करत आहेत आणि फोटो शेअर करत आहेत. मल्लिकाचे सोशल मीडिया अकाऊंट प्रायव्हेट असलं तरी तिला पल्लवी जोशी फॉलो करत असल्याचंही स्पष्ट झालं आहे. त्यामुळे हे फोटो विवेक अग्निहोत्री यांच्या मुलीचेच असू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वडिलांचे विधान आणि मुलीचे त्याच्या विपरीत फोटो शेअर करून सोशल मीडियावर विवेक यांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे. याबद्दल विवेक किंवा पल्लवी यांपैकी कुणीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. हे फोटो नेमके तीचेच आहेत की नाहीत याची पुष्टी अजून कुणीच दिलेली नाही, पण एकंदरच सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्री यांना यावरून प्रचंड ट्रोल केलं जात आहे.