विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या संवेदनशील विषयांवरील चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्याचबरोबर सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि चित्रपटक्षेत्रातील मुद्द्यांवर ते आपले मत मांडतात अन् यामुळेच ते चर्चेत असतात. नुकतंच नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा ट्वीट करत बॉलिवूडमध्ये होणाऱ्या अशा गूढ आणि एकाकी मृत्यूबद्दल भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त २ ऑगस्ट २०२३ रोजी समोर आलं आणि सारी चित्रपटसृष्टी हळहळली. कित्येक कलाकार तर अद्याप त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडमध्ये होणाऱ्या या दुर्दैवी घटनांवर आपलं मत मांडलं आहे.

आणखी वाचा : “मला उत्कृष्ट अभिनेत्रीचा…” ‘ड्रीम गर्ल २’च्या निमित्ताने आयुष्मान खुरानाने व्यक्त केली मनातली सुप्त इच्छा

आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, “हे असे जग आहे जिथे तुम्ही कितीही यशस्वी झालात तरी शेवटी तुम्ही एक पराभूत व्यक्तिच असता. नाव, पैसा प्रसिद्धी, फेम, या सगळ्या गोष्टी या जगात तुम्हाला अगदी चटकन मिळतं. बॉलिवूड तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या नैतिक दबावातून मुक्त करतं. तुम्ही खून, दहशतवाद, बलात्कार किंवा दारू पिऊन गाडी चालवण्यासारख्या गुन्ह्यापासूनही सहज वाचू शकता.”

पुढे ते लिहितात, “एकदा पैसा यायला सुरुवात झाली कि त्याची सवय होते. आपण मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो असल्याने एवढ्या पैशांचं काय करायचं कळत नाही. त्यानंतर पुढची पिढी येते, पण तुम्हाला पैसा, प्रसिद्धीची एवढी सवय झालेली असते की त्यासाठी रोज झगडावं लागतं आणि मग हळूहळू या गडद विश्वात तुम्ही खोलवर जाता आणि हरवून बसता. तुम्ही हळूहळू स्वतःशीच बोलायला लागता कारण तुमचं ऐकून घ्यायला कुणीच नसतं. हळूहळू तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा तिटकारा यायला लागतो. अशातच छताला टांगलेला पंखा हाच तुमचा एकमेव फॅन बनतो आणि तुम्हाला या एकाकी जीवनातून मुक्त करायला मदत करतो. काही लोक आहे तसंच आयुष्य जगतात पण ते प्रत्येक क्षणाला मृत्यूला कवटाळत असतात तर काही लोक गळफास घेऊन एकदाच स्वतःला संपवून मोकळे होतात.”

विवेक अग्निहोत्री यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर प्रचंद चर्चा होत आहे. लवकरच विवेक अग्निहोत्री त्यांचा आगामी ‘द व्हॅक्सीन वॉर’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivek agnihotri post on twitter speaking about lonely deaths in bollywood avn
Show comments