शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना यातील शाहरुख खानचे वेगवेगळे लूक्स पसंत पडले आहेत. आता या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने चांगली कमाई करायला सुरुवात केली आहे.

संपूर्ण इंडस्ट्रीतसुद्धा याच चित्रपटाची चर्चा आहे. ‘द काश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट देणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीसुद्धा शाहरुख खानच्या या ‘जवान’साठी उत्सुक आहेत. नुकतंच विवेक यांनी ट्विटरवर ‘Ask Me anything’ च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी अन् नेटकऱ्यांशी संवाद साधला. याबरोबरच आपल्या चाहत्यांच्या काही ठराविक प्रश्नांची उत्तारंही दिली.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”

आणखी वाचा : तब्बल ३० वर्षांनी एकत्र आले शाहरुख खान व सनी देओल; ‘गदर २’च्या सक्सेस पार्टीतील दोघांच्या गळाभेटीचा व्हिडीओ व्हायरल

याचदरम्यान बऱ्याच लोकांनी त्यान शाहरुख खानच्या ‘जवान’बद्दल विचारलं. ‘जवान’च्या ट्रेलर कसा वाटला किंवा ते ‘जवान’ पाहणार का? असे प्रश्न बऱ्याच लोकांनी त्यांना विचारले. त्यावर उत्तर देताना विवेक अग्निहोत्री म्हणाले, “ट्रेलर फारच अद्भुत आहे, हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार हे नक्की. मला हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचा आहे, पण तिकीटंच उपलब्ध नाहीयेत, शाहरुखला विचारून माझ्यासाठी एका तिकीटाची सोय करा.”

https://x.com/vivekagnihotri/status/1697922591196070260?s=46&t=Tv2djsi5AA5T7LHxnLwItA
https://x.com/vivekagnihotri/status/1697922262304010609?s=46&t=Tv2djsi5AA5T7LHxnLwItA

याआधी ‘जवान’वर बनलेला एक मीम शेअर करत मध्यंतरी विवेक या चित्रपटाची खिल्ली उडवली होती. आता या चित्रपटाची तारीफ केल्याने बरेच लोक त्यांना ट्रोल करत आहेत. ‘जवान’ ७ सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर धडकणार आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपटाची २.७१ लाख तिकिटे विकली गेली आहेत. यातूनच चित्रपटाने ८.९८ कोटींची कमाई प्रदर्शनाच्या आधीच केली आहे.

Story img Loader