ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनले आहेत. इंग्लिश भूमीवर अल्पसंख्याक नेत्याने हे स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण त्यानंतर भारतात मात्र वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. भविष्यात आपल्या देशातही अल्पसंख्याक पंतप्रधान होऊ शकतो का? असा प्रश्न आता देशभरातून केला जात आहे. एकीकडे काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या प्रश्नाला भाजपाने, “देशाला राष्ट्रपती आणि पंतप्रधान अल्पसंख्याक समाजातून मिळाले आहेत” असं उत्तर दिलं आहे. तर दुसरीकडे चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनीही या वादात उडी घेतली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’च्या दिग्दर्शकाने, ‘ज्या दिवशी भारतातील सर्व मुस्लीम भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हणतील, तेव्हा देश मुस्लीम पंतप्रधान स्वीकारण्यास तयार होईल.’ असं मत मांडलं आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी पत्रकार अरफा खानुम यांच्या ट्वीटला उत्तर देताना हे ट्विट केले आहे. अरफाने ट्विटरवर लिहिलं होतं, ‘मग भारतात मुस्लीम पंतप्रधान स्वीकारण्यासाठी आणि निवडण्यासाठी आम्ही कधी तयार होणार?’ या ट्वीटला उत्तर देताना अग्निहोत्री यांनी लिहिलं, ‘ज्या दिवशी भारतातील सर्व मुस्लीम ‘काफिर’ या शब्दावर बंदी घालतील, इस्लामिक दहशतवादाविरुद्ध बिनधास्त बोलतील, काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकारतील, सर्वप्रथम स्वत:ची भारतीय म्हणून ओळख करून देतील. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ त्याच आवेशाने आणि वचनबद्धतेने म्हणतील तेव्हा नक्कीचं असं होईल. तुम्ही तयार आहात का?’

आणखी वाचा- “आपल्या मातृभूमीतील…”; ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक यांची निवड झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांचा सणसणीत टोला

दरम्यान याआधी विवेक अग्निहोत्री यांनी काँग्रेस नेते शशी थरूर यांनाही असेच उत्तर दिले होते. शशी थरूर यांनी ट्विटरवर लिहिलं होतं की, “जर असं असेल तर ब्रिटनच्या जनतेने अप्रतिम काम केलं आहे हे मान्य करावं लागेल. अल्पसंख्याक समाजातील सदस्याला त्यांच्या देशातील सर्वात शक्तिशाली पदावर संधी देण्यात आली आहे. आज आपण सर्व भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा विजय साजरा करत आहोत, तर मग हे इथे भारतात शक्य आहे का? हेही प्रामाणिकपणे विचारले पाहिजे.”

आणखी वाचा-“मला हा चित्रपट…” ‘कांतारा’ पाहिल्यानंतर विवेक अग्निहोत्रींनी केला रिव्ह्यू

शशी थरूर यांच्या या ट्वीटला उत्तर देताना विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं, “१० वर्षे शीख अल्पसंख्याक समुदायाचा सदस्य देशाचा पंतप्रधान होता, ज्यावर ख्रिश्चन अल्पसंख्याक समुदायातील पक्षाच्या अध्यक्षाने राज्य केलं आणि पक्षाध्यक्ष होण्याच्या शर्यतीत तुमचा पराभव करणारी व्यक्तीही दलित समाजातील आहे.”

Story img Loader