शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या या चित्रपटाचं पहिलंच गाणं ‘बेशरम रंग’ प्रदर्शित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या गाण्यात दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद रंगला आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या गाण्यावर प्रतिक्रिया देताना टीका केली. पण तीच टीका आता विवेक यांच्यावर उलटली. सोशल मीडियावर त्यांच्या मुलीचे भगव्या बिकिनीमधील फोटोज शेअर करून त्यांना ट्रोल केलं जात आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्यांनी बॉलिवूड चित्रपटांतून दाखवल्या जाणाऱ्या अश्लीलतेवर ताशेरे ओढले. त्या क्लिपमध्ये एक किशोरवयीन मुलगी गाण्याचे आताच्या पीढीवर होत असलेल्या परिणामांवर चिंता व्यक्त करताना दिसत आहे. या ट्वीटनंतर सोशल मीडियावर त्यांच्याविरुद्ध ट्रोलिंग सुरू झालं आहे. या टीकेवरून सध्या त्यांना सोशल मीडियावर चांगलाच विरोध होताना दिसत आहे.

आणखी वाचा : श्रद्धा वालकर हत्याकांडावर आधारीत ‘क्राइम पेट्रोल’चा नवा भाग पाहून प्रेक्षक संतापले, म्हणतायत ‘बॉयकॉट सोनी टीव्ही’

विवेक यांना सोशल मीडियावर बरेच लोक धमक्या देत आहेत. शिवीगाळ करत आहेत. याविषयी त्यांनी स्क्रीनशॉट घेत माहिती दिली आहे. इतकंच नव्हे तर विवेक यांना घरात घुसून जीवेमारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली आहे. शाहरुख खानच्या चाहत्यांच्या फेक अकाऊंट्सवरून हे मेसेज आल्याचं स्पष्ट होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबद्दल ट्विटरवर विवेक अग्निहोत्री व्यक्त झाले आहेत. शाहरुखचं कोलकाता चित्रपट महोत्सवातील व्यक्तव्याचा आधार घेत विवेक यांनी या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहेयाबरोबरच ते लिहितात, “बादशाह खरंच बोलतोय, सोशल मीडियावर प्रचंड नकारत्मकता आहे. (पण आपण पॉझिटिव्ह लोक आहोत)” शाहरुखचं नाव घेत त्यांनी हे अप्रत्यक्षरित्या केलेलं ट्वीट चांगलंच चर्चेत आहेत. पठाण २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे, तर विवेक अग्निहोत्री यांचा आगामी ‘द व्हॅक्सीन वॉर’ हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.