जगभरात लोकप्रिय असलेल्या ‘कान्स फिल्म फेस्टिवल’ला सुरुवात झाली आहे. फ्रान्समध्ये होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या लूकमुळे अनेक नेटकरी तिला ट्रोल करताना दिसत आहेत. द कश्मीर फाईलचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ऐश्वर्याचा हा लूक आवडलेला दिसत नाहीये. अग्निहोत्री यांनी ट्वीट करत ऐश्वर्या रायच्या लूकवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कान्स २०२३’ मधील ऐश्वर्या रायचा लेटेस्ट लूक शेअर करताना विवेक अग्निहोत्रीने लिहिले, ‘तुम्ही ‘पोशाख गुलाम’ हा शब्द ऐकला आहे का. त्या बहुतेक मुली असतात. तुम्ही त्याला आता भारतातील जवळपास प्रत्येक महिला सेलिब्रिटींबरोबर पाहू शकता. अशा अस्वस्थ फॅशनसाठी आपण इतके मूर्ख आणि दडपशाही का बनत आहोत?’ ऐश्वर्या रायने परिधान केलेल्या गाऊन मागून एवढा मोठा होता की त्याला सांभाळण्यासाठी एक माणूस उभा होता. यावरुनच अग्निहोत्रींनी टीका केली आहे.

हेही वाचा- “याला म्हणतात सनक..”; ट्वीटरवर परत येताच कंगना राणौतने एलॉन मस्कबरोबर केली स्वत:ची तुलना, पोस्ट चर्चेत

ऐश्वर्या राय-बच्चन ही गेल्या २१ वर्षांपासून कान्स महोत्सवात सहभागी होत आहे. यंदाच्या कान्स महोत्सावासाठी ऐश्वर्या रायने खास लूक केला होता. यावेळी ऐश्वर्याने गाऊन परिधान केला होता. काळा आणि सिल्व्हर रंगाचे हा गाऊन फारच खास वाटत होता. विशेष म्हणजे या गाऊनला तिने हुडी असल्याप्रमाणे लूक दिला होता.

ऐश्वर्या रायच्या या लूकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. यावर एकाने कमेंट करताना म्हटले की, “ती सोलार पॅनलसाठी दिसत आहे आणि त्यासाठीच ती सूर्यापासून ऊर्जा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.” तर एकाने “अल्युमिनियम फॉईलमध्ये पराठा असल्यासारखं”, अशी कमेंट या व्हिडीओवर केली आहे. तिने “आतापर्यंत कान्स महोत्सवात घातलेल्या पोशाखांपैकी सर्वात वाईट पोशाख”, असे एकाने म्हटले आहे.

हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या निर्मात्यांची मोठी घोषणा; धर्मांतराच्या जाळ्यातून बाहेर पडलेल्या महिलांसाठी ‘एवढ्या’ लाखांची करणार मदत

दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल १६ ते २७ मे पर्यंत असणार आहे. या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर आतापर्यंत सारा अली खान, मृणाल ठाकूर, उर्वशी रौतेला, ईशा गुप्ता यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटी पाहायला मिळाले.