दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे गेले काही दिवस खूप चर्चेत आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’ या त्यांचा चित्रपट मध्यंतरी ऑस्करच्या मुद्द्यावरून चर्चेत आला होता. २०२२ मधील बहुचर्चित चित्रपटांच्या यादीमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सामील आहे. १९९० मध्ये काश्मिरी पंडितांनी सहन केलेला अन्याय आणि त्यावेळी घडलेली परिस्थिती या चित्रपटाद्वारे सांगण्यात आली. तसेच विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावरही सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या घटनांबद्दल ते नेहमी भाष्य करतात. तसेच बॉयकॉटच्या मुद्द्यावरून त्यांनी बॉलिवूड कलाकारांवर अनेकदा निशाणा साधला आहे. अशातच आता ते काय नवीन घेऊन येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. पण आता त्यांच्या एका ट्वीटने चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : Video: धर्मांतर केलेल्या केरळमधील ‘त्या’ ३२,००० महिलांची हृदयद्रावक कहाणी, ‘द केरळ स्टोरी’चा टीझर प्रदर्शित

‘द काश्मीर फाईल्स’प्रमाणेच यावर्षी यावर्षी ज्या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली तो म्हणजे ‘पुष्पा.’ अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रचंड गाजला. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढील भागाची वाट बघत आहेत. अशातच ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘पुष्पा’ या चित्रपटांचे दिग्दर्शक आता लवकरच एकत्र येऊन प्रेक्षकांसाठी एक दर्जेदार कलाकृती घेऊन येणार असल्याचं समोर आलं आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी नुकतेच केलेले एक ट्वीट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ‘पुष्पा’चे दिग्दर्शक सुकुमार आणि ‘द काश्मीर फाइल्स’चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांची भेट घेतली. या भेटीचा एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. यासोबत त्यांनी हे तिघे लवकरच एकत्र काम करणार असल्याचे संकेतही दिले. त्यांनी लिहिले, “चित्रपटाच्या माध्यमातून भारताला एकत्र आणत आहोत. अधिक माहिती लवकरच कळेल. ओळखा पाहू? सुकुमार (दिग्दर्शक, #पुष्पा) + अभिषेक अग्रवाल (निर्माते, #द काश्मीर फाईल्स) + युअर्स ट्रूली (#द काश्मीर फाईल्स)”

हेही वाचा : ‘द काश्मीर फाईल्स’ने रचला नवा विक्रम, ‘या’ गोष्टीत ‘ब्रह्मास्त्र’ला टाकले मागे

विवेक अग्निहोत्री यांच्या या पोस्टवरून हे तीन दिग्गज आता लवकरच एक नवा चित्रपट घेऊन येणार असल्याचं उघड झालं आहे. ट्वीटवर कमेंट्स करत नेटकरीही या नव्या प्रोजेक्टबद्दल उत्सुकता दाखवत आहेत. त्यामुळे आता हा चित्रपट कोणत्या विषयावर असणार आणि त्यात कोणकोण कलाकार असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.