अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीने आज (११ नोव्हेंबर) वयाच्या ४६ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून टीव्ही मालिकांमध्ये काम करत होता. ‘कुसुम’, ‘वारिस’ आणि ‘सूर्यपुत्र कर्ण’ अशा मालिकांमुळे तो घराघरात पोहोचला. जिममध्ये व्यायाम करताना त्याचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या जाण्याने टेलिव्हिजन विश्वामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्यामागे त्याची पत्नी अलेसिया आणि दोन मुलं असा परिवार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जय भानुशालीने सोशल मीडियावर सिद्धांतचा फोटो शेअर करत चाहत्यांना त्याच्या निधनाची बातमी दिली. आता मनोरंजनविश्वातील दिग्गजांनीही यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी याप्रकरणी वक्तव्यं केलं आहे. सिद्धांतचा फोटो शेअर करत विवेक यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा : ‘कांतारा’स्टार रिषभ शेट्टीने ‘या’ कारणामुळे बदललं स्वतःचं नाव; खऱ्या नावाबद्दल अभिनेत्याचा खुलासा

आपल्या ट्वीटमधून विवेक अग्निहोत्री म्हणाले, “हे खूपच धक्कादायक आहे. शरीर कमावण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय व्यायाम करणं हे धोकादायक आहे. ‘हायपर जीमिंग’ ही संकल्पना सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड बोकाळली आहे. एक समाज म्हणून या गोष्टीवर फेरविचार करायला हवा. ओह सिद्धांत ओम शांती.”

सिद्धांतने मॉडेल म्हणून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. त्याला काहीजण आनंद म्हणूनही ओळखतात. ‘कुसुम’ या हिंदी मालिकेमध्ये काम करुन अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. तो मालिकांमुळेच पुढे आला. ‘कसौटी जिंदगी की’, ‘कृष्णा अर्जुन’, ‘क्या दिल में है’ अशा मालिकांमध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘तो क्यू रिश्तों में है कटी बट्टी’ आणि ‘जिद्दी दिल’ या मालिकांमध्येही सिद्धांत झळकला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivek agnihotri viral tweet abour late serial actor siddhant veer suryavnashi avn