‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या या चित्रपटामुळे अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता नुकतंच झी५ या ओटीटीवर विवेक यांचा ‘द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. विवेक अग्निहोत्री यांना अनेकदा आपण या चित्रपटाबद्दल आणि काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराबद्दल स्पष्टपणे बोलताना पाहिलं आहे, पण नुकत्याच एका मुलाखतीमध्ये यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर विवेक अग्निहोत्री मुलाखत मध्येच सोडून गेल्याचं समोर आलं आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट अगदी सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आणि यावरून बरीच चर्चाही झाली. नुकतंच या संदर्भात एका मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री यांना काही प्रश्न विचारण्यात आले ज्यामुळे त्यांनी ती मुलाखत मध्येच बंद केली. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Where are the modern Indian political thinkers says Yogendra Yadav
आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत आहेत कुठे?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
marathi actress suhasini Deshpande
व्यक्तिवेध: सुहासिनी देशपांडे
when raj kapoor met nargis dutt at rishi kapoor wedding
“माझे पती देखणे अन् रोमँटिक आहेत, त्यामुळे…”; नर्गिस यांना स्पष्टच बोलल्या होत्या राज कपूर यांच्या पत्नी
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
Shekhar Khambete, tabla maestro shekhar khambete, tabla maestro, theater, Vijaya Mehta, artistic legacy, versatile artist, musical heritage
शेखर खांबेटे : एक कलंदर तबलावादक…
satara A minor girl commits suicide
अल्पवयीन मुलीची तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; साताऱ्यात तणाव, पोलीस अधीक्षकांचे कठोर कारवाईचे आदेश
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर

व्हिडीओमध्ये मुलाखत घेणारी पत्रकार महिला विवेक अग्निहोत्री यांना त्यांच्या चित्रपटामुळे समाजातील विशिष्ट वर्गावर टीका होत असण्याबद्दल विचारत आहे. याबरोबरच हा चित्रपट मुस्लिम विरोधी अजेंडा पसरवत असल्याचंही तिने नमूद केलं. याबरोबरच तिने ‘द काश्मीर फाइल्स’ला भाजपाने पाठिंबा देण्याबद्दलही विवेक अग्निहोत्री यांना विचारलं. यावर विवेक अग्निहोत्री यांनी स्पष्टपणे नकार दिला.

आणखी वाचा : “दोन्ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…” ‘धर्मवीर २’बाबत निर्माते मंगेश देसाई यांचा मोठा खुलासा

विवेक अग्निहोत्री म्हणाले, “देशातील ४ कोटी लोकांनी हा चित्रपट पाहिला ते सगळे भाजपा समर्थक होते का? असं नाहीये या देशातील प्रत्येक वर्गाने तो चित्रपट पाहिला आहे आणि प्रमोट केला आहे. आजवर काश्मीरमधील हिंदूंच्या नरसंहाराविषयी कुणीच भाष्य केलं नव्हतं. आमच्या चित्रपटामुळे त्यावर लोक बोलू लागले.” पुढे जेव्हा भाजपाकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल आणखी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मात्र विवेक यांनी मुलाखत मध्येच थांबवून तिथून काढता पाय घेतला.

विवेक यांच्या टीमने ही मुलाखत मध्येच थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कॅमेरा सुरू असतानाच ते तिथून निघून गेले, त्यावेळी ते त्या महिला पत्रकाराला म्हणाले, “मला माहिती आहे तुम्ही नेमके कशासाठी आला आहात आणि तुमच्या प्रश्नांचा रोखही मला चांगलाच ठाऊक आहे, याचा मला चांगलाच अनुभव आहे.” असं म्हणून विवेक अग्निहोत्री यांनी तिथून काढता पाय घेतला.

त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काहींनी त्या महिलेची चूक दाखवून दिली आहे तर काहींनी विवेक अग्निहोत्री यांना पळपुटा म्हणून त्यांच्यावर टीका केली आहे. विवेक अग्निहोत्री हे लवकरच त्यांचा आगामी चित्रपट ‘द व्हॅक्सीन वॉर’ प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत. नुकताच त्याचा छोटासा टीझरही प्रदर्शित करण्यात आला.