चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री अनेकदा चर्चेत असतात. गेल्या वर्षी त्यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटावरुन मोठा गदारोळ माजला होता. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या कथेवरुनही नवा वाद निर्माण झाला आहे. या वाढत्या वादावरुन आता विवेक अग्निहोत्री यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या टीमला एक इशारा दिला आहे.

हेही वाचा- Video : “आधी पैसे द्या मग मी तुम्हाला..”; उर्फी जावेदची चाहत्यांकडे भलतीच मागणी, व्हिडीओ व्हायरल

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
Star Pravah New Serial Lagnanantar Hoilach Prem
Video : ठरलं! मृणाल दुसानिसची नवीन मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये झळकणार ‘हे’ दमदार कलाकार
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक
a daughter angry on his father for Spreading things in the house
“नुसता पसारा करतात…” चिमुकलीने काढली वडीलांची खरडपट्टी, Video होतोय व्हायरल

विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत द केरला स्टोरीच्या टीमसाठी एक मोठे पत्र लिहले आहे. “तुम्हाला द्वेशाचा सामना करावा लागेल”, अशी चेतावणी देण्यात आली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी द केरळ स्टोरीच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. . विवेक यांनी त्यांच्या पोस्टमध्ये विपुल शाह, दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि द केरळ स्टोरीची निर्माती अभिनेत्री अदा शर्मा यांना इशारा दिला आहे की, या चित्रपटानंतर तुमचे आयुष्य पूर्वीसारखे राहणार नाही, असे पत्रात म्हणले आहे.

अग्निहोत्री यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे. प्रिय विपुल शाह आणि सुदिप्तो सेन आणि अदा खान, तसेच द केरळ स्टोरीची संपूर्ण टीम, या धाडसी प्रयत्नाबद्दल मी प्रथम तुमचे अभिनंदन करतो. याशिवाय मी तुम्हाला एक वाईट बातमी देतो की आता तुमचे आयुष्य पूर्वीसारखे राहणार नाही. मर्यादेपलीकडे द्वेष सहन करावा लागेल. तुम्हाला गुदमरायला सुरुवात होईल. काही वेळा तुम्ही गोंधळून जाऊ शकता आणि रागावू शकता.

हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’ वादाच्या भोवऱ्यात; तमिळनाडूतील मल्टीप्लेक्स संघटनांनी चित्रपटाविरोधात घेतला मोठा निर्णय

विवेक अग्निहोत्रीने पुढे लिहिले की सिनेमा समाजाचे वास्तव प्रतिबिंबित करतो हे ऐकून मी मोठा झालो आहे. मी शिकलो आहे की आधुनिक काळात मीडिया आणि राजकारण जे करू शकत नाही ते करण्याची ताकद सिनेमात आहे. ते वास्तव मांडू शकते, इतिहास दुरुस्त करू शकते, सांस्कृतिक युद्धे लढू शकते आणि मोठ्या भल्यासाठी राष्ट्राची सॉफ्ट पॉवर देखील बनू शकते.

हेही वाचा- “गुगलवर फक्त ‘हे’ दोन शब्द सर्च करा” ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला प्रोपगंडा म्हणताच भडकली अदा शर्मा

भारतात अशा प्रकारचा सिनेमा बनवणे सोपे नाही. मी ट्रॅफिक जॅम, द ताश्कंद फाइल्स आणि द काश्मीर फाईल्स करुन पाहिल्या. या चित्रपटानंतर माझ्यावर शारीरिक, व्यावसायिक, सामाजिक आणि मानसिक हल्ला झाला. विवेक अग्निहोत्री यांच्या अगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा एक सकारात्मक चित्रपट आहे. मात्र, या चित्रपटावरही मोठ्या प्रमाणात टीका कऱण्यात येत आहे. अग्निहोत्री यांनी आपल्या पोस्टमध्ये चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.