Vivek Oberoi Buys Rolls Royce : २००२ मध्ये ‘कंपनी’ चित्रपटातून पदार्पण करत विवेक ओबेरॉयने बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा परिणाम करिअरवर होऊन अभिनेता बॉलीवूडपासून दुरावला गेला होता. एक काळ असा होता जेव्हा विवेकला कामंही मिळत नव्हतं. पण, या सगळ्यावर मात करून अभिनेत्याने आपला व्यवसाय सांभाळला. हळुहळू चित्रपटसृष्टीत पुनरागमन करून आपला एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला. सिनेविश्वापासून दूर असूनही आजच्या घडीला विवेकची संपत्ती करोडोंच्या घरात आहे. गेल्या तीन वर्षांपासून विवेक दुबईला स्थायिक झाला आहे. नुकतील अभिनेत्याने रोल्स रॉयस ही आलिशान गाडी खरेदी केली आहे.

विवेक ओबेरॉयने ( Vivek Oberoi ) दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नव्या घरात गृहप्रवेश केला होता. आता त्या पाठोपाठ त्याने आपल्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. विवेकने रोल्स रॉयस गाडी खरेदी केली आहे. ही आलिशान गाडी अनेकांची ड्रीम कार आहे. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : कपूर कुटुंबात लगीनघाई! बॉलीवूड अभिनेत्रीशी ब्रेकअप झाल्यावर करीनाचा आतेभाऊ कोणाशी करतोय लग्न? फोटो आले समोर

विवेक ओबेरॉयने घेतली नवीन गाडी

रोल्स रॉयस खरेदी करून विवेकने आपल्या कुटुंबीयांना सुद्धा छानसं गिफ्ट दिलं आहे. सिल्व्हर ग्रे रंगाची विवेकची ही रोल्स रॉयस आलिशान गाडी पाहून अभित्याचे आई-बाबा, पत्नी सगळेच आनंदी होते. यानंतर ओबेरॉय कुटुंबीय एकत्र ड्राइव्हवर निघतात. यावेळी विवेक सर्वात आधी आपल्या नव्या गाडीची किल्ली वडिलांच्या हाती सुपूर्द करतो. हा क्षण पाहून सगळेजण भारावून गेले. विवेकच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

“आपल्या आयुष्यात यश हे कोणत्याही स्वरुपात येऊ शकतं. आज माझं यश असं दिसतंय… माझ्या कुटुंबीयांसमोर हा सुंदर क्षण अनुभवता आला हे माझं भाग्यच आहे.” असं कॅप्शन विवेकने ( Vivek Oberoi ) या व्हिडीओला दिलं आहे. रोल्स रॉयस गाडी खरेदी केल्याचा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम सायलीचं शिक्षण माहितीये का? मिळवलंय Gold Medal; उच्चशिक्षित जुई अभिनयाकडे कशी वळली?

मिळालेल्या माहितीनुसार विवेकने ( Vivek Oberoi ) ही रोल्स रॉयस गाडी दुबईत खरेदी केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो दुबईत राहतो. त्याने खरेदी केलेल्या Rolls Royce Cullinan Black Badge गाडीची किंमत तब्बल १२.२५ कोटी एवढी आहे. असं वृत्त ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलं आहे.