Vivek Oberoi : २००२ मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यावर विवेकने या संपूर्ण प्रवासात अनेक चढउतार अनुभवले. बॉलीवूडमधला त्याचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. टॉक्सिक रिलेशनशिप, ब्रेकअप या सगळ्यातून अभिनेता बाहेर कसा पडला, याशिवाय त्याच सगळ्या गोष्टींमध्ये अडकून राहिल्यावर आयुष्य कसं थांबत यावर विवेकने भाष्य केलं आहे. आयुष्याच्या खडतर प्रवासात वेळीच सगळं सोडून दुसरा मार्ग निवडला नसता, तर प्रचंड नुकसाच झालं असतं हे सुद्धा विवेकने मान्य केलं आहे. आजच्या घडीला अभिनेता आघाडीचा व्यावसायिक म्हणून सुद्धा ओळखला जातो.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेकने ( Vivek Oberoi ) ऐश्वर्या राय व सलमान खान यांच्याबरोबर भूतकाळात झालेले मतभेद मान्य करून या दोन्ही कलाकारांबद्दल मोजक्या शब्दात टिप्पणी केली आहे. डॉ. जय मदानच्या युट्यूब वाहिनीला विवेकने मुलाखत दिली. यावेळी त्याला एका सेगमेंटमध्ये काही नावांवर प्रतिक्रिया देण्यास सांगितलं होतं.
हेही वाचा : ‘Pushpa 2’च्या प्रीमियरला गालबोट; चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू; २ जण जखमी, थिएटरचा गेटही ढासळला
विवेकने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
विवेकने ( Vivek Oberoi ) ‘कंपनी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाचं नाव घेताच विवेकने ‘माय लव्ह’ असं उत्तर दिलं. यानंतर त्याच्या पत्नीचं म्हणजेच प्रियांका अल्वाचं नाव घेण्यात आलं. यावर विवेकने ‘माय Only Love’ अशी प्रतिक्रिया दिली. वडिलांबद्दल विचारलं असता ‘माय आयडॉल’ असं उत्तर अभिनेत्याने दिलं.
यानंतर विवेकच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये ज्या दोन व्यक्तींमुळे चढउतार आले, अशा दोघांबद्दल त्याला थेट नाव घेऊन प्रश्न विचारण्यात आला. ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांची नावं ऐकताच विवेकने सारखचं उत्तर दिलं आहे. केवळ ३ शब्दांत ‘God bless Him/Her’ अशी प्रतिक्रिया अभिनेत्याने स्मितहास्य करत दिली. तर अभिषेक बच्चन हे नाव घेताच अभिनेत्याने, “तो सहृदयी आणि खूपच छान माणूस आहे” असं म्हटलं आहे.
विवेक ( Vivek Oberoi ) अभिनेता आहेच पण, याशिवाय त्याला आघाडीचा व्यावसायिक म्हणून देखील ओळखलं जातं. कठीण काळावर मात करून एक नवीन आयुष्य जगण्यास कशी सुरुवात केली? याबद्दल विवेक सांगतो, “कदाचित त्या गोष्टी घडल्या नसत्या तर मी आता फक्त वरवरचं जीवन जगणारा माणूस झालो असतो. खोटं वागणाऱ्या लोकांमध्ये वावरून त्यांच्यासारखं ‘प्लास्टिक लाइफ’ मी जगलं असतं. पण, आता मला लोकांनी ट्रोल केलं तरी फरक पडणार नाही. कारण, माझ्या जीवनाचं उद्दिष्ट मला माहिती आहे. माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे याचीही मला जाणीव आहे.”