बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय(Vivek Oberoi) हा अनेकदा त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असल्याचे दिसते. चित्रपट, शूटिंगदरम्याचे किस्से याबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत अभिनेता खुलासा करताना दिसतो. आता विवेक ओबेरॉयने नुकत्याच एका मुलाखतीत ब्रेकअपला कसे सामोरे जावे, तरूण मुलांनी नेमके काय केले पाहिजे यावर वक्तव्य केले आहे. याबरोबरच, अभिनेत्याने त्याचा प्रेमभंग झाल्यानंतर त्याने काय केले होते, यावरदेखील वक्तव्य केले आहे.
काय म्हणाला विवेक ओबेरॉय?
अभिनेता विवेक ओबेरॉय हा काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता एका मुलाखतीत तरूण पिढीने ब्रेकअपसारख्या गोष्टींना कसे सामोरे जावे याबद्दल विवेकने त्याचे मत मांडले आहे. ब्रेकअप झाल्यानंतर मुले काही गोष्टी करताना दिसतात.ज्यामध्ये साधर्म्य ब्रेकअपनंतर धोका मिळाल्यासारखा वाटतो. मग मुले मित्रांबरोबर दारू पितात त्यांच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल वाईट बोलून मनातील राग व्यक्त केला जातो. काही मुले पुन्हा रिलेशनशिपमध्ये येत नाहीत. ते आयुष्यभर एकटे राहण्याचा निर्णय घेतात. तर काहीजण याउलट करतात. ते अनेक मुलींनी मुलीला डेट करतात. ते कधीही कोणाशीही गंभीर नाते निभावत नाहीत, कारण ते नाते जर तुटले तर ते खूप दुखावणारे असते.
पुढे अभिनेत्याने म्हटले की यामुळे एखादा व्यक्ती चूकीच्या दृष्टीकोणातून विचार करू शकतो. त्याचा स्वत:चा खरेपणा निघून जाऊ शकतो. एखादी मुलगी तुम्हाला सोडून जाते. तेव्हा तिच्याबरोबर तुमच्या भावनासुद्धा घेऊन जाते. ते चुकीचे आहे. एखादी मुलगी तुम्हाला नकार देते. मात्र, तुम्ही स्वत:ला नाकारू शकत नाही. तुम्हाला तुमच्यावर काम करण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्याची गरज आहे. पण अनेक मुलींना डेट करणे, दारू पिणे असे प्रकार केले जातात. याला बॉलीवूडदेखील तितकेच जबाबदार आहे.
भविष्यातील नात्यांमध्ये चूका टाळण्यासाठी आधी झालेल्या चूकांवर चिंतन करण्याचा सल्ला अभिनेत्याने दिला. याबरोबरच, गैरवर्तन किंवा विश्वासघाताच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही त्याने दिला. जर तुमची चूक नसेल आणि तुम्ही निर्दोष असाल तर स्वत:चे रक्षण करणे आवश्यक आहे, असेही विवेकने म्हटले.
विवेकने आपला वैयक्तिक अनुभव शेअर करताना म्हटले माझा प्रेमभंग झाल्यानंतर मी स्वत:ला हरवून बसलो होतो. अनेकदा एखाद्या गोष्टीतून बाहेर येण्याऐवजी त्या भावनांवर लक्ष केंद्रित करतो. मी ४-५ वर्षे त्यामध्ये अडकलो होतो. प्रियांका माझ्या आयुष्यात येईपर्यंत खूप कठीण काळ होता. मी नकारात्मक झालो होते. माझी खात्री होती मी आयुष्यभर एकटा राहीन. मी प्रेमात स्वत:ला इतके समर्पित करून घेतले की मी खरा कोण आहे, हे विसरलो होतो. मी स्वत:ला बदलले होते. मी स्वत:ला शिक्षा देत होतो”, असा खुलासा अभिनेत्याने केला.
काही दिवसांपूर्वीच विवेक ओबेरॉयने डॉक्टर जय मदान यांच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने म्हटले, “माझ्या करिअरमध्ये मी असा एक संघर्षाचा काळ अनुभवला, ज्यावेळी मला आर्थिक ताण सहन करावा लागला. मी खूप तणावात होतो. मला अंडरवर्ल्डमधून धमक्यांचे फोन यायचे. मी माझ्या आयुष्यात असे कधी अनुभवले नव्हते. हे सगळे एकत्र घडले.” पुढे अभिनेत्याने असेही म्हटले, “मी रिलेशनशिपच्या कठीण टप्प्यातून गेलो होतो.”
विवेक ओबेरॉय ऐश्वर्या रायबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, २००३ मध्ये ते वेगळे झाले. २०१०मध्ये प्रियांका अल्वाबरोबर अभिनेत्याने लग्नगाठ बांधली.