विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) व राणी मुखर्जी (Rani Mukerji) यांनी शाद अलीच्या ‘साथिया’ चित्रपटात एकत्र काम केले आणि त्यांच्या अप्रतिम केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली. पण, २००२ मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्या दोघांना विवेकच्या चाहत्यांनी घेराव घातला होता. विवेक ओबेरॉयने एका मुलाखतीत हा प्रसंग सांगितला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत विवेक ओबेरॉयने ‘साथिया’ (Saathiya) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चाहत्यांच्या घोळक्याने घेराव घातल्याचा किस्सा सांगितला होता. तो काळ आठवताना त्याने सांगितले होते की, १२ एप्रिल २००२ रोजी त्याचा ‘कंपनी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्याच रविवारी तो ‘साथिया’ सिनेमातील राणी मुखर्जीचा पाठलाग करणारा सीन शूट करत होता. मुंबईच्या ‘गेटी गॅलेक्सी’ सिनेमागृहाजवळील रेल्वे परिसरात शूटिंग सुरू होते. त्यावेळी राणी मुखर्जी स्टार बनली होती आणि तिच्याबरोबर सुरक्षा रक्षकही होता.

हेही वाचा…‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”

परंतु, सकाळी सुमारे ११ वाजता अचानक लोक विवेकच्या ‘कंपनी’ चित्रपटातील चंदूभाई या पात्राचे नाव घेऊन ओरडू लागले. सुरुवातीला विवेकला खूप आश्चर्य वाटले; पण काही वेळात चार-पाच लोकांपासून तो जमाव २००० लोकांपर्यंत पोहोचला आणि संपूर्ण सुरक्षा व्यवस्थाही कोलमडली. “शूटिंगचा एक दिवस वाया जाणार या विचारानं मी घाबरलो होतो. शादनं मला तिथून बाहेर काढण्यासाठी राणीच्या मेकअप व्हॅनमध्ये ढकललं. मी खिडकीतून बाहेर पाहत होतो,” असे विवेकने सांगितले होते.

शेवटी शूटिंग लोकेशनवर पोलिसांना बोलावण्यात आले. दिग्दर्शक शादने विवेकला दरवाजा उघडून बाहेरच्या गर्दीकडे पाहायला सांगितले होते आणि तो विवेकला म्हणालेला, “तू स्टार आहेस.” या मुलाखतीत विवेकने सांगितले होते, “त्यांच्यामुळे मला पोलिसांनी एखाद्या गुन्हेगारासारखं व्हॅनमध्ये बसवून तिथून हलवलं. पुढील रविवारी योग्य पोलीस संरक्षणासह आम्ही तोच सीन पुन्हा शूट केला.”

हेही वाचा…“करिअरमधील सर्वात लहान प्रकरण”, समीर वानखेडेंचे आर्यन खानबद्दल वक्तव्य; शाहरुखच्या डायलॉगबद्दल म्हणाले, “थर्ड क्लास…”

मुलाखतीदरम्यान, विवेकने ‘साथिया’ सिनेमाचे कमी बजेट, त्यात करावे लागलेले शूटिंग हा अनुभवही सांगितला होता. त्यावेळी केवळ राणीला मेकअप व्हॅन मिळायची आणि विवेकला रेस्टॉरंट्सच्या बाथरूम किंवा हॉटेलच्या वॉशरूममध्ये कपडे बदलावे लागायचे. इतकेच नव्हे, तर रस्त्यावरच मेकअपचे टचअप्स करावे लागायचे. कारण- त्यावेळी कुणीही त्याला ओळखत नव्हते. विवेकने सांगितले की, तो स्वत: ट्रायपॉड खांद्यावरून सेटवर घेऊन यायचा आणि संपूर्ण टीमबरोबर चालायचा. विशेष म्हणजे त्याने ‘साथिया’साठी सलग २२-२३ तास शूटिंग केली आणि चेहऱ्यावर थकवा दिसू नये यासाठी बाकावर वर्तमानपत्र पसरवून तिथे काही वेळ हलकीशी झोप (नॅप) घ्यायचा.