बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या अभिनयाबरोबरच फिटनेससाठीही ओळखला जातो. तो त्याचे फिटनेस रुटीन काटेकोरपणे पाळतो. विवेक ओबेरॉयने अक्षय फिटनेससाठी वेळ कसोशीने पाळतो, त्याचे त्याला आलेले काही अनुभव सांगितले आहे. एकदा पहाटे साडेचार वाजता अक्षयने विवेकला व्यायाम करण्यासाठी बोलावलं होतं, तेव्हाचा किस्सा त्याने शेअर केला. तसेच रोजच्या वेळेत झोपण्यासाठी बाकीचे जेवत असताना तो कसा निघून गेला, तेही विवेकने सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एंटरटेनमेंट लाइव्हशी बोलताना विवेकने (Vivek Oberoi) अक्षयबरोबर एकदा पहाटे वर्कआउट केल्याचा किस्सा सांगितला. “अक्षय कुमार खरंच काटेकोरपणे वेळ पाळतो. एकदा त्याने मला त्याच्याबरोबर वर्कआउटसाठी यायला सांगितलं. तो म्हणाला, ‘उद्या काय करतोयस? माझ्याबरोबर वर्कआउटला ये.’ मी त्याला वेळ विचारल्यावर त्याने ४:३०. सांगितलं. मी म्हटलं, ‘तू संध्याकाळी साडेचार वाजता म्हणतोय, बरोबर ना?’ तो म्हणाला. ‘पहाटे साडेचार वाजता!’ मी त्याला होकार दिला आणि पहाटे पोहोचलो. तिथे मंकी बार आणि इतर काही व्यायामाची उपकरणं होती. तो उड्या मारत होता, लटकत होता आणि वर्कआउट करत होता. नंतर त्याने मला नारळाच्या झाडावर चढायला सांगितलं. तो फिटनेस फ्रीक आहे,” असं विवेक म्हणाला.

“गर्दीतील एकाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श…”, ईशा देओलबरोबर पुण्यात घडलेला धक्कादायक प्रसंग; म्हणाली, “मी त्याला…”

अक्षयच्या घरी घडलेला किस्सा

विवेकने आणखी एक किस्सा सांगितला. एकदा अक्षयने विवेक आणि रितेश देशमुखला (Riteish Deshmukh) त्याच्या घरी जेवायला बोलावलं होतं. पण हे दोघे जेवत असतानाच तो झोपायला निघून गेला. “अक्षय इतका शिस्तबद्ध आहे की एकदा आम्ही त्याच्या घरी जेवत होतो. घड्याळात रात्रीचे ९:३० वाजले आणि तो वरच्या मजल्यावर गेला. आम्हाला वाटलं की तो वॉशरूमला गेला आहे, पण तो परत खाली आलाच नाही. आम्ही रात्री ११ वाजेपर्यंत त्याची वाट पाहत होतो. नंतर त्याची पत्नी ट्विंकल खन्ना खाली आली आणि आम्हाला म्हणाली, ‘तुम्ही आता घरी जा. तो झोपला आहे!’ तो इतका शिस्तप्रिय आहे,” असं विवेक हसत म्हणाला.

“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

अक्षय कुमारच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास अलीकडे आलेले त्याचे बहुतांशी चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. ‘खेल खेल में’, ‘सरफिरा’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘मिशन राणीगंज’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर वाईट कामगिरी केली. ‘सिंघम अगेन’, ‘स्काय फोर्स,’ ‘जॉली एलएलबी ३’, ‘वेलकम टू द जंगल’, ‘शंकरा’, ‘हेरा फेरी ३’ हे त्याचे आगामी चित्रपट आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivek oberoi reveals akshay kumar asked him to climb coconut tree early morning left him and riteish deshmukh at dinner table hrc