Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयने त्याच्या २२ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिले. चर्चेत राहिलेलं रिलेशनशिप, त्यामुळे ओढवलेले वाद, बॉलीवूडने टाकलेला बहिष्कार या सगळ्या गोष्टींमुळे विवेक अक्षरश: कोलमडून गेला होता. एक क्षण असा आला होता की, विवेककडे कोणतंही काम नव्हतं. जवळपास १५ महिने तो घरात होता. त्यावेळी अभिनेत्याने आपल्या आईच्या डोळ्यात पाणी पाहिलं आणि तो घरात ढसाढसा रडला. यानंतर विवेकच्या आईने त्याला एका खास जागी नेलं होतं. त्या दिवसानंतर विवेकचा आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून गेला. याबद्दल अभिनेत्याने जय मदानच्या ‘जानेमन’ पॉडकास्टमध्ये खुलासा केला आहे.

विवेक ओबेरॉय म्हणाला, “मुलांचं कसं असतं माहितीये का? कोणी मला रडताना पाहू नये, नेहमी कणखर राहिलं पाहिजे अशा खूप गोष्टी असतात. एकंदर आयुष्यात एक वेगळा मुखवटा घेऊन आपण जगत असतो. पण, असा एक क्षण आला जेव्हा मी माझ्या आईला रडताना पाहिलं. आई माझी शक्ती आहे, तिच्या डोळ्यात पाणी पाहिल्यावर मी कोलमडून गेलो. मी आईच्या मांडीवर डोकं ठेवून प्रचंड रडलो. त्यादिवशी मी लहान मुलांसारखा रडलो. आईने माझे केस नीट केले आणि विचारलं उद्या काही काम आहे तुला? मी सांगितलं काहीच नाहीये. कारण, मला कोणीच काम देत नव्हतं. मी घरीच होतो, आईने मला सांगितलं की, उद्या आपण एका ठिकाणी जाऊयात. कुठे, काय मला काहीच सांगितलं नाही.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : मराठमोळी अभिनेत्री लवकरच होणार आई! नवरा आहे लोकप्रिय हिंदी अभिनेता, २०१३ मध्ये झालेली मिस Diva युनिव्हर्स

विवेक ( Vivek Oberoi ) पुढे म्हणाला, “माझी आई मला टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तिथे लहान-लहान कर्करोगग्रस्त मुलं होती. त्या मुलांचे पालकही तिथेच होते. त्या दिवसानंतर माझं संपूर्ण आयुष्य बदललं आणि याचं श्रेय माझ्या आईला जातं. तिथे ७ ते ८ वर्षांचा मुलगा होता, त्याला कॅन्सरचं निदान झालं होतं. केस गेलेले, डोळे लाल झाले होते, त्या मुलाची केमोथेरपी सुरू होती. त्याच्याकडे पाहून मला वाटलं अरे आपलं दु:ख काहीच नाहीये. आपण आयुष्यात काय विचार करतो माहितीये… अरे या व्यक्तीने माझ्याबरोबर असं केलं, माझं वाईट झालं. पण, या खऱ्या समस्या नाहीयेत. आपल्या समस्यांपेक्षा त्या मुलांचं दु:ख खूप मोठं आहे.”

हेही वाचा : “केरळ फिरतोय, पैसे फुकट गेले…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

Vivek Oberoi
अभिनेता विवेक ओबेरॉय व त्याची आई ( Vivek Oberoi )

“त्या लहान मुलांच्या आयुष्याची परीक्षा माझ्यापेक्षा खूपच मोठी होती. मी त्यादिवशी त्या मुलांना असाच रिकाम्या हाती भेटायला गेलो होतो. खेळणी, खाऊ काहीच नेलं नव्हतं, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं. मी जेवढा उदास, दडपणात होतो… त्या सगळ्या गोष्टी रुग्णालयातील मुलांना भेटून हळुहळू नाहीशा झाल्या. मी काही दिवस रोज त्या रुग्णालयात जायचो. डॉक्टरांच्या सल्ल्याने खाऊ नेला, खेळणी नेली. काही दिवसांनी रुग्णालयात मी एक ‘टॉयबँक’ सेटअप करून दिली. कारण, प्रत्येक मुलांच्या पालकांना एवढी खेळणी वगैरे खरेदी करणं जमायचं नाही. एका आर्टिस्टकडून हॉस्पिटलच्या भिंती रंगवून घेतल्या. गेल्या काही वर्षांत आम्ही जवळपास अडीच लाख मुलांची मदत केलीये. या सगळ्या गोष्टी करून माझ्या आयुष्यात एक वेगळं समाधान आलं. मी यासाठी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. मनातली भिती, रिजेक्शन या सगळ्याकडे मी दुर्लक्ष करून एक नवं आयुष्य जगण्यास सुरुवात केली. आज देवाने मला जे काही दिलंय, यामागे या सगळ्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांनी दिलेले आशीर्वाद आहेत.” असं विवेक ओबेरॉयने ( Vivek Oberoi ) सांगितलं.

Story img Loader