Vivek Oberoi New Home : दिवाळीच्या मुहूर्तावर सध्या संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण आहे. घराघरांत मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जात आहे. सामान्य लोकांप्रमाणे बॉलीवूड सेलिब्रिटी सुद्धा शूटिंगमधून ब्रेक घेत आपल्या कुटुंबीयांसह हा दिवाळीचा सण साजरा करतात. काही अभिनेत्यांनी या शुभमुहूर्तावर नवीन गाड्या खरेदी केल्या आहेत. तर, काहींनी नव्या घरांमध्ये गृहप्रवेश केल्याचं पाहायला मिळालं. अभिनेता विवेक ओबेरॉयने दिवाळी आणि लग्नाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.

विवेक ओबेरॉयने ( Vivek Oberoi ) २९ ऑक्टोबर २०१० मध्ये प्रियांका अल्वाशी लग्नगाठ बांधली. विवेकची पत्नी प्रियांका अल्वा ही कर्नाटकचे माजी दिवंगत माजी मुख्यमंत्री जीवराज अल्वा यांची मुलगी आहे. प्रियांका सामाजिक कार्यकर्ता असून अनेक NGO साठी प्रियांकाने काम केलेलं आहे. या जोडप्याला दोन मुलं आहेत. विवेक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss संपल्यावर सूरज चव्हाण रमला गावच्या शेतात, ट्रॅक्टरही चालवला; नेटकरी म्हणाले, “गावरान मुंडे…”

विवेक ओबेरॉयचा नव्या घरात गृहप्रवेश

विवेक ओबेरॉयने ( Vivek Oberoi ) त्याच्या नव्या घरात नुकतीच धनत्रयोदशीची पूजा केली. या फोटोमध्ये विवेकने पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड कुर्ता घातलेला दिसतो. तर, त्याची पत्नी प्रियांकाने हिरव्या रंगाची नक्षी असलेली गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. गळ्यात हार, कपाळाला टिकली, केसात गजरा या लूकमध्ये प्रियांका खूपच गोड दिसत आहे. हा फोटो अभिनेत्याने पूजेदरम्यान काढला आहे. तसेच कॅप्शनमध्ये विवेकने त्याच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

विवेक ओबेरॉय म्हणतो, “१४ वर्षांपूर्वी आम्ही सात फेरे घेतले. तेव्हा मी प्रियांकाला आपलं प्रेम आयुष्यभर असंच राहील असं वचन दिलं होतं. आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आम्ही आमच्या वडिलांच्या आशीर्वादाने आमच्या सुंदर नवीन घरात जात असताना, मी सर्वात आधी कृतज्ञता व्यक्त करतो. प्रियांका तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यातील घराच्या फॅन्सी भिंतींना काहीच अर्थ नाही. तूच माझ्यासाठी माझं घर आहेस आणि तिथेच माझं हृदय कायम असेल.”

हेही वाचा : प्रिया बापटने गायलं ५६ वर्षांपूर्वीचं सुपरहिट बॉलीवूड गाणं! सुमधूर आवाजाचं सर्वत्र होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, “अप्रतिम…”

नेटकऱ्यांसह मनोरंजन विश्वातील कलाकारांनी या ( Vivek Oberoi ) पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या जोडप्याला विवान वीर आणि अमेय निर्वाण अशी दोन मुलं आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेता रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ या ओटीटी सीरिजमध्ये झळकला होता.