विवेक ओबेरॉयने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले, त्यात ‘कंपनी’, ‘साथिया’, ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. पण एक वेळ अशी आली की विवेकच्या सर्वच चित्रपटांना फटका बसू लागला, त्याची कारकीर्द संपुष्टात येऊ लागली आणि त्याला काम मिळणं अवघड झालं. बराच काळ त्याला घरीच बसून राहावं लागलं, परिणामी त्याला डिप्रेशनचा सामना करावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विवेक ओबेरॉयने आता ‘बॉलिवूड बबल’ला एक मुलाखत दिली आहे आणि त्यात त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. विवेक ओबेरॉयने सांगितले की, “मलाही आत्महत्या करावं वाटत होतं, त्यामुळे सुशांतबरोबर काय झालं ते मी समजू शकतो.” या मुलाखतीत विवेकने ऐश्वर्या रायबरोबरच्या त्याच्या अफेअरबद्दलही भाष्य केलं.

“ज्यांनी ‘माजिली’ पाहिला…” ‘वेड’ दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असल्याच्या चर्चांवर रितेश देशमुखने अखेर सोडलं मौन

विवेक म्हणाला, माझं जेव्हा ऐश्वर्याशी ब्रेकअप झालं, तेव्हा केवळ माझ्या वैयक्तिक आयुष्यातच नाही तर फिल्मी करिअरमध्येही खूप नुकसान झालं होतं. मी तब्बल १८ महिने रिकामा बसलो होतो. मी इतके चांगले चित्रपट देऊनही मला काम मिळत नव्हतं. माझ्या आयुष्यातील तो टप्पा इतका वाईट होता की मी डिप्रेशनमध्ये गेलो आणि आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.

करिअरच्या सुरुवातीला जेव्हा विवेकला ऐश्वर्याबरोबरचं नातं जाहीरपणे उघड करण्याबाबत विचारण्यात आलं असता तो म्हणाला, “त्या सर्व गोष्टी घडून गेल्या आहेत, आता मी त्यावर काहीही बोलणार नाही. कारण, जर तुम्हाला तुमच्या वाटत असेल की कुणीही तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलू नये आणि तुम्ही तितके संवेदनशील असाल तर स्वतःच त्याबद्दल बोलणं टाळा.”

Pathaan Controversy : “ज्याला धर्मामध्येही रंग…” भगवी बिकिनीच्या वादादरम्यान दीपिका पदुकोणचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

विवेक ओबेरॉय पुढे म्हणाला, तो काळ असा होता की बॉलीवूडवर फक्त ५-१० लोकांचं नियंत्रण होतं आणि जर कोणाबद्दल काही गैरसमज असेल तर त्याला काम मिळायचं नाही. पण आता ओटीटी आल्यानंतर परिस्थिती खूप बदलली आहे. खरं तर माझ्याबरोबर जे काही घडलं त्याबद्दल माझ्या मनात कटुता नाही, कारण मला पत्नी प्रियांका आणि आईचा खूप पाठिंबा आहे. विवेकने २०१० मध्ये प्रियंका अल्वाशी लग्न केलं, त्यांना दोन अपत्ये आहेत.

कामाबद्दल बोलायचं झाल्यास विवेक ओबेरॉय २०१९ मध्ये ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता, त्यानंतर तो ‘व्हर्सेस ऑफ वॉर’ या शॉर्ट फिल्ममध्ये भारतीय सैनिकाच्या भूमिकेत दिसला होता. नुकताच तो ‘धारावी बँक’मध्ये सुनील शेट्टीबरोबर दिसला होता, ज्यामध्ये त्याने भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivek oberoi talks about depression and suicide after break up with aishwarya rai sushant singh rajput hrc