एमएक्स प्लेअरच्या ‘धारावी बँक’ या वेबसीरिजमधून बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय पुन्हा चर्चेत आला आहे. मधली काही वर्षं बॉलिवूडपासून दूर फेकल्या गेलेल्या विवेकने पुन्हा चित्रपटसृष्टीत जम बसवायला सुरुवात केली आहे. तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि तमिळ चित्रपटात नशीब आजमावल्यानंतर विवेक ओबेरॉयने आता मराठी चित्रपटात काम करायची इच्छा व्यक्त केली आहे.

विवेक ओबेरॉयने बऱ्याचदा त्याचा मित्र आणि अभिनेता रितेश देशमुखकडे याबद्दल विचारणा केली आहे. विवेक म्हणाला, “माझं आणि रितेशचं या बाबतीत बऱ्याचदा बोलणं होतं, तो मध्येच मला फोन करून सांगतो की मराठी चित्रपट करूया, मीदेखील त्याला उत्साहात होकार देतो अन् पुढे काहीच होत नाही.” रितेश देशमुखबरोबर मराठी चित्रपट करायची इच्छा विवेक ओबेरॉयने व्यक्त केली आहे.

saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Supriya Sule, Baramati Assembly, Supriya Sule on Baramati Assembly, candidate, Ajit Pawar, Jay Pawar , Yugendra Pawar, NCP, Sharad Pawar
सततच्या बाहेर राहण्यामुळे मुलेही मावशी म्हणू लागली, सुप्रिया सुळे यांची कोटी
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Fandry Fame Somnath Awaghade And Rajeshwari Kharat
गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा अन्…; ‘फँड्री’तील जब्या-शालूचा नवा फोटो चर्चेत; नेटकरी म्हणाले, “खरंच लग्न झालं का…”
woman was cheated, lure of government job,
पुणे : शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची २० लाखांची फसवणूक
kartik aaryan on his dating life
कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”

आणखी वाचा : ‘या’ अभिनेत्रीच्या संशयास्पद मृत्यूनंतर रवीना टंडनला मिळालं ‘टीप टीप बरसा पानी’ हे गाणं

हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधताना विवेक म्हणाला, “मी कोणत्याही भाषेत काम करण्यास तयार आहे. प्रादेशिक चित्रपट हा आता प्रादेशिक राहिलेला नाही. जर तुमचा चित्रपट चांगला असेल तर तो सुपरहीट ठरतोच. रितेशच्या ‘वेड’चंच उदाहरण घ्या, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.”

‘साथीया’, ‘कंपनी’सारखे लागोपाठ हीट चित्रपट देणाऱ्या विवेक ओबेरॉयला बॉलिवूडमधून बरंच लांब फेकण्यात आलं होतं. यानंतर विवेकच्या करिअरला उतरती कळा लागली आणि मग थेट ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’मधून विवेकने पुन्हा कमबॅक केलं. विवेकच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धारावी बँक’ या सीरिजमधील भूमिकेचं लोकांनी खूप कौतुक केलं आहे. यात विवेकबरोबरच सुनील शेट्टीदेखील मुख्य भूमिकेत आहे.