चित्रपटगृहात जाऊन सिनेमे पाहण्याची मजा काही औरच असते. दर आठवड्याला असंख्य चित्रपट प्रदर्शित होत असल्याने अनेकदा सलग सिनेमागृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहणं खर्चिक ठरतं. परंतु, या शुक्रवारी फक्त ९९ रुपयांमध्ये तुम्हाला सिनेमा पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीव्हीआर आणि आयनॉक्सने एक नवीन ऑफर जाहीर केली आहे, ज्यात तुम्ही तुमचा आवडता चित्रपट फक्त ९९ रुपयांमध्ये पाहू शकता. ‘सिनेमा लव्हर्स डे’च्या निमित्ताने पीव्हीआर आणि आयनॉक्स सिनेमाअंतर्गत या शुक्रवारसाठी ही ऑफर वैध आहे. तुम्ही ‘ऑल इंडिया रँक’, ‘आर्टिकल ३७०’, ‘क्रॅक’, ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ आणि ‘फायटर’ यांसारखे नवीन प्रदर्शित झालेले चित्रपट निवडू शकता. हॉलीवूड चित्रपटांमध्ये, ‘मॅडम वेब’, ‘द होल्ड ओव्हर्स’, ‘बॉब मार्ले-वन लव्ह’, ‘मीन गर्ल्स’ आणि ‘द टीचर्स लाउंज’ असे पर्याय आहेत.

हेही वाचा… मनीष मल्होत्राऐवजी ‘या’ डिझायनरची निवड; रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीचा लग्नात खास लूक

९९ रुपयांच्या सवलतीच्या किमतीव्यतिरिक्त, नियमित जागांसाठी पीव्हीआर आणि आयनॉक्सने प्रीमियम फॉरमॅटसाठीही आकर्षक किंमत आणली आहे. यात रिक्लायनर सीट्स १९९ रुपयांना उपलब्ध असतील, तर ज्यांना आयमॅक्स, ४ डीएक्स, एम एक्स ४ डी आणि गोल्ड कॅटेगरीतील चित्रपटांचा अनुभव घ्यायचा असेल, तर ते सवलतीच्या तिकीट दरांचा लाभ घेऊ शकतात.

हेही वाचा… ट्विंकल खन्नाच्या ‘त्या’ विधानावर कंगना रणौतचे खडेबोल; म्हणाली, “पुरुषांना प्लास्टिकची बॅग…”

पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडचे सह-सीईओ गौतम दत्ता म्हणाले, “भारतीय प्रेक्षकांच्या हृदयात चित्रपटाचं स्थान महत्त्वाचं आहे. ‘नॅशनल सिनेमा डे’च्या यशापासून प्रेरणा घेऊन ‘सिनेमा लव्हर्स डे’ साजरा करून हा उत्सव आणखी मजेशीर करताना आम्हाला आनंद होत आहे.

कर्नाटक आणि दक्षिणेकडील राज्ये वगळता, ९९ रुपयांची ही विशेष ऑफर २३ फेब्रुवारी २०२४ रोजी बुक केलेल्या पीव्हीआर आणि आयनॉक्स या चित्रपटगृहांतील सिनेमांसाठी लागू आहे.

हेही वाचा… आलिया भट्ट लेक राहासाठी रोज लिहिते ई-मेल; रणबीर कपूरने केला खुलासा, म्हणाला…

गौतम दत्ता पुढे म्हणाले, “२३ फेब्रुवारी रोजी उपलब्ध असलेल्या चित्रपटांच्या निवडीसह या सोहळ्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आम्ही प्रत्येक भारतीय चित्रपटप्रेमीचे स्वागत करतो.”

किफायतशीर दरात मोठ्या स्क्रीनचा आनंद घेण्याची सुवर्णसंधी गमावू नका!

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch film at rupees on this friday offer by pvr and inox dvr