पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी (३० ऑगस्ट) बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या भेटीसाठी मुंबईतल्या त्याच्या ‘जलसा’ निवासस्थानी पोहोचल्या होत्या. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुझिव्ह अलायन्स (I.N.D.I.A)च्या दोन दिवसीय बैठकीसाठी ममता बॅनर्जी मुंबईत आल्या आहेत. पण त्यापूर्वी त्यांनी बिग बी यांची भेट घेतली आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं त्यांना राखी बांधली. सध्या सोशल मीडियावर त्यांचे बच्चन कुटुंबीयांबरोबरचे फोटो व्हायरल होत आहेत.
हेही वाचा – बिग बॉस विजेती मेघा धाडेची भाजपाच्या ‘या’ पदी नियुक्ती; म्हणाली, “मला…”
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर अभिषेक बच्चनने ममता बॅनर्जी यांना घरी येण्याचं आमंत्रण दिली होतं. यावेळी संपूर्ण बच्चन कुटुंबीयांनी ममता बॅनर्जी याचं स्वागत केलं. शिवाय ममता यांनी अमिताभ बच्चन यांना राखी बांधली. या भेटीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “मी आज खूप आनंदी आहे. मी भारताच्या भारतरत्न अमिताभ बच्चन यांना भेटली आणि त्यांना राखी बांधली. मला हे कुटुंब खूप आवडलं. भारतातील नंबर वन बच्चन कुटुंब आहे. त्यांचं खूप मोठ योगदान आहे. मी त्यांना दुर्गा पूजा आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं आहे.”
अमिताभ बच्चन आणि पत्नी जया बच्चन यांचे ममता बॅनर्जी यांच्याबरोबर खूप चांगले संबंध आहेत. गेल्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग घेतला होता.
हेही वाचा – “किती काळ काठावर उभं राहून…” बिग बॉस फेम अभिनेत्यानं भाजपमध्ये केला जाहीर प्रवेश; म्हणाला…
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १५वं पर्व होस्ट करण्यात व्यग्र आहेत. तसेच लवकरच बिग बी टायगर श्रॉफच्या ‘गणपथ’ आणि दीपिका पदुकोणच्या ‘कल्कि 2898 एडी’मध्ये पाहायला मिळणार आहेत.