बॉलिवूडच्या किंग खान शाहरुख खानने त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवत याने वेगवेगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. शाहरुखच्या चाहत्यांनी आणि एकूणच चित्रपट रसिकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. प्रदर्शनाआधी हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला, पण त्यामुळे चित्रपटाचं फारसं नुकसान झालं नाही.

शाहरुखच्या या चित्रपटाने ‘बाहुबली’ आणि ‘केजीएफ २’सारख्या चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. पहिल्याच दिवशी ‘पठाण’ने ५७ कोटींची कमाई केली होती. भारतात ५४५ कोटी तर परदेशात तब्बल ३९६.०२ कोटी इतकी कमाई शाहरुखच्या ‘पठाण’ने केली. एवढे पैसे कमावून चित्रपट निर्माते आदित्य चोप्रा आणि यश राज फिल्म्स यांना नेमका किती फायदा झाला ही गोष्ट आता समोर आली आहे.

Compensation , Railways , Prajakta Gupte, Kalyan,
रेल्वे अपघातात मरण पावलेल्या कल्याणच्या प्राजक्ता गुप्तेना रेल्वेकडून आठ लाखाची भरपाई
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय?
tur dal price , tur dal price sangli , tur dal,
तूरडाळ सामान्यांच्या आवाक्यात !
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
Direct tax rises 16 prcent to Rs 16.9 lakh crore in FY25
वैयक्तिक प्राप्तिकरातील वाढ अर्थव्यवस्थेसाठी वरदान; प्रत्यक्ष कर संकलन १२ जानेवारीपर्यंत १६.९० लाख कोटींवर
In Jammu And Kashmir, PM Modi Assures All Promises Will Be Fulfilled
सर्व आश्वासने पूर्ण करणार! बोगद्याच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांची जम्मूकाश्मीरच्या जनतेला ग्वाही
Rupee sinks to record low, settles 66 paise down
रुपयाची दोन वर्षांतील सर्वांत मोठी गटांगळी

आणखी वाचा : “अंकुश चौधरी हा अत्यंत बेसुर गायक…” केदार शिंदेंच्या वक्तव्यानंतर खुद्द अंकुशने सांगितला ‘तो’ धमाल किस्सा

‘बॉलिवूड हंगामा’च्या रिसर्च आणि वृत्तानुसार या चित्रपटातून यश राज फिल्मला जबरदस्त फायदा झाला आहे. ‘पठाण’चे बजेट २७० कोटी होते. चित्रपटाने जगभरात ९०० कोटींहून अधिक कमाई केली, त्यापैकी ३०० कोटींच्या आसपास पैसे हे वितरकांना देण्यात आले. याबरोबरच सॅटेलाईट आणि म्युझिकचे हक्क मिळून १८० कोटी या चित्रपटाने आधीच कमावले होते. त्यामुळे हे आकडे पाहता २७० कोटींच्या गुंतवणुकीवर यश राज फिल्म्स आणि आदित्य चोप्राने ६०३ कोटी इतकी कमाई केली ज्यात ३३३ कोटी रुपयांचा फायदा झाल्याचं सांगितलं जात आहे.

‘पठाण’साठी शाहरुखने कोणतंही मानधन घेतलं नसून त्याने नफ्यात ६०% भागीदारी घेतल्याचं म्हंटलं जात आहे. याचाच अर्थ शाहरुख खानला ‘पठाण’साठी जवळपास २०० कोटींचं मानधन मिळालं आहे. अर्थात हे सगळे आकडे हे एका न्यूज साईटच्या रिसर्चमधून समोर आलेले असल्याने ते अचूक असल्याचा दावा करता येणार नाही. ‘पठाण’नंतर आता याच स्पाय युनिव्हर्सच्या ‘टायगर vs पठाण’ या चित्रपटासाठी यश राज फिल्म्स प्रचंड मेहनत घेत आहे.

Story img Loader