अभिनेता अरबाज खानने काही दिवसांपूर्वी दुसरं लग्न केलं. त्याने २४ डिसेंबर २०२३ रोजी शुरा खानशी लग्नगाठ बांधून आश्चर्याचा धक्का दिला. त्याने ५६ व्या वर्षी दुसरं लग्न केलं आणि त्यानंतर दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली होती.
अरबाज खानच्या लग्नाला खान कुटुंब उपस्थित होतं. सलमान खान, सोहेल खान, त्यांचे पालक, रवीना टंडन व लेक राशा थडानी, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख आणि त्यांची दोन्ही मुलं होती. याशिवाय अरबाजचा मुलगा अरहान देखील या लग्नात हजर होता. हा लग्न सोहळा अर्पिता खान व आयुष शर्मा यांच्या घरी पार पडला होता.
अरबाज खानचे पहिले लग्न मलायका अरोराशी झाले होते. १९ वर्षांच्या संसारानंतर ते विभक्त झाले होते. त्यांनी सहा वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला आणि त्यांना अरहान नावाचा मुलगा आहे. घटस्फोटानंतर मलायका अरोरा अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाजचं नाव जॉर्जिया अँड्रियानीशी जोडलं गेलं होतं. पण त्याने काही दिवसांपूर्वी मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसरं लग्न केलं.
१८ जानेवारी रोजी शुरा खानचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहिले होते. शुरासाठी नणंद अर्पिताने पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर तिच्या वयाची चर्चा सुरू झाली आहे. अर्पिताने शुराला ३१ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अरबाज खान ५६ वर्षांचा असून शुरा अवघ्या ३१ वर्षांची आहे. या दोघांच्या वयात तब्बल २५ वर्षांचं अंतर आहे.
खूपच साधं आयुष्य जगतो आमिर खानचा लेक, जुनैद खान काय काम करतो? जाणून घ्या
अरबाजचा जन्म ४ ऑगस्ट १९६७ रोजी झाला होता. तर शुराचा वाढदिवस १८ जानेवारीला असतो. ती ३१ वर्षांची आहे, तर अरबाज ५६ वर्षांचा आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार अरबाज खान व शुरा यांची भेट ‘पटना शुक्ला’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. शुरा खान ही बॉलीवूडमधील लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट आहे. तिने रवीना टंडनबरोबर बरीच वर्षे काम केलं आहे.