एकेकाळी आपल्या दमदार अभिनयाने आणि लूकने प्रेक्षकांच्या मनांवर राज्य करणारे दिग्गज अभिनेते शशी कपूर आता हयात नाहीत. अतिशय देखणे असलेल्या शशी कपूर यांच्या लूकची त्याकाळी खूप चर्चा व्हायची. सिनेसृष्टीत नावाजलेले शशी कपूर यांच्याइतकंच यश त्यांच्या मुलांना मिळू शकलं नाही.

शशी कपूर यांनी १९५८ मध्ये जेनिफर केंडलशी लग्न केलं होता. लग्नानंतर त्यांना तीन मुलं झाली, त्यांना कुणाल व करण नावाची मुलं व संजना नावाची मुलगी आहे. या तिन्ही भावंडांनी बॉलीवूडमध्ये नशीब आजमावलं पण यश आलं नाही. शशी आणि जेनिफरची यांची तिन्ही मुलं आता काय करतात ते जाणून घेऊया.

करण कपूर पुरस्कार विजेते फोटोग्राफर

शशी कपूर यांचे सुपूत्र करण कपूर यांनी बॉलीवूडमध्ये नशीब आजमावलं पण ते वडिलांप्रमाणे नाव कमवू शकले नाही. ‘जुनून’ या चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्यांनी केवळ ‘३६ चौरंगी लेन’, ‘लोहा’ आणि ‘सल्तनत’ या तीन चित्रपटांमध्ये काम केलं. करिअरच्या सुरुवातीला ते हॉलीवूड अभिनेत्यासारखे दिसायचे, त्यांचा लूक करिअरमध्ये अडचणीचा ठरला आणि त्यांना फारसं काम मिळालं नाही.

अक्षय कुमारच्या सिनेमामुळे बुडाले पैसे, आता तोच धिरज देशमुखांच्या सासऱ्यांच्या मदतीसाठी आला पुढे; जॅकी भगनानी म्हणाला…

बॉलीवूडमध्ये अपयश आल्यानंतर त्यांनी लंडनला जाऊन स्वतःची फोटोग्राफी कंपनी उघडली. या काळात त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींबरोबर काम केलं, फोटोग्राफीमध्ये यश मिळवल्यानंतर ते भारतात परतले. करण कपूर यांना २००९ मध्ये इंटरनॅशनल फोटोग्राफीमध्ये एक मोठा पुरस्कार मिळाला होता.

“आम्ही दारू प्यायलो अन्…”, घटस्फोटानंतर पतीसह केलेल्या पार्टीबद्दल सई ताम्हणकरचे विधान; नात्यातील फसवणुकीबद्दल म्हणाली…

संजना कपूर यांनी अभिनय सोडून सुरू केला थिएटर ग्रुप

शशी कपूर यांची मुलगी संजना कपूरने बॉलीवूडमध्ये अभिनेत्री म्हणून काम केलं पण तिलाही यश मिळाले नाही. ‘३६ चौरंगी लेन’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. मग संजना कपूरने ‘सलाम बॉम्बे’, ‘हीरो हिरालाल’, ‘उत्सव’ आणि ‘अरण्यका’ या चित्रपटांमध्ये काम केलं.

संजना कपूर अभिनयात काही विशेष करू शकली नाही. आता ती ‘जुनून’ नावाचा स्वतःचा थिएटर ग्रुप चालवत आहे. २०१२ मध्ये तिने या ग्रुपची सुरुवात केली. याआधी संजना पृथ्वी थिएटरही चालवत होती.

“गर्लफ्रेंडची जात वेगळी असल्याने आईने दिला नकार”, ‘सैराट’ फेम तानाजीचा खुलासा; म्हणाला, “जातव्यवस्था हे सर्वात मोठं…”

कुणाल कपूर आता काय करतात?

शशी कपूर यांच्या तीन मुलांपैकी कुणाल कपूर सर्वात मोठे आहेत. ६५ वर्षीय कुणाल यांनी ‘उत्सव’, ‘त्रिकाल’, ‘जुनून’, ‘सिंग इज ब्लिंग’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘विजय’ आणि ‘पानिपत’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘सिद्धार्थ’ या इंग्रजी चित्रपटातून त्यांनी अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.

भाऊ आणि बहिणीप्रमाणे कुणालही बॉलीवूडमध्ये नाव कमावू शकले नाहीत. यानंतर त्यांनी ‘ॲड फिल्मवाला’ नावाची जाहिरात व चित्रपट निर्मिती कंपनी सुरू केली. ते आता देशातील सर्वात यशस्वी जाहिरात दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांच्या कंपनीने आतापर्यंत ८०० हून जास्त टीव्ही जाहिरातींचे दिग्दर्शन केले आहे.