‘द आर्चीज’मधून सुहाना खान बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची निर्माती जोया अख्तर आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अनेक स्टारकिड दिसणार आहेत. सुहाना यात वेरोनिका लॉज नावाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट कॉमिक बुक ‘द आर्चीज’वर आधारित आहे.
रवींद्र महाजनींचा मृत्यू कशामुळे झाला? लेक गश्मीरने केला खुलासा; म्हणाला, “डॉक्टरांनी सांगितलं की…”
सुहानाने नुकताच ‘वॉग इंडिया’शी संवाद साधला. यावेळी तिला चित्रपटाशी संबंधित काही प्रश्न विचारण्यात आले. तसेच तुझा बॉयफ्रेंड दुसऱ्या मुलींमध्ये इंटरेस्ट घेऊ लागला, तर तू काय करशील असा एक प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर सुहानाने दिलेलं उत्तर चर्चेत आहे. बॉयफ्रेंडने फसवणूक केल्यास काय करशील या प्रश्नावर किंग खानची लेक काय म्हणाली, ते जाणून घेऊयात.
सुरुवातीला सुहानाने चित्रपटातील पात्र वेरोनिकाच्या दृष्टिकोनातून उत्तर दिलं की, वेरोनिकाला अप्रोच करणाऱ्या मुलांची एक मोठी यादी आहे. त्यामुळे बायफ्रेंड इतर मुलींशी बोलत असेल तर वेरोनिकाही इतर मुलांशी बोलू शकते. रिअल लाइफ बॉयफ्रेंडबद्दल विचारलेल्या प्रश्नावर सुहाना म्हणाली, “जर माझ्या बॉयफ्रेंडने असं केलं तर मी त्याला सोडेन. कारण मला ‘वन वुमन मॅन’ आवडतात. गर्लफ्रेंड असूनही दुसऱ्या मुलीशी बोलणाऱ्या मुलाशी नातं पुढे न्यायला मला अजिबात आवडणार नाही.”
सुहाना खान शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी आहे. ‘द आर्चीज’मध्ये एकत्र काम केल्यानंतर सुहाना आणि अगस्त्य नंदा एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, श्रीदेवींची धाकटी मुलगी खुशी कपूरही झळकणार आहे.