बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांचा आज ८० वा वाढदिवस. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता आजही कायम आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावले. त्यांनी चार दशकांहून अधिक काळ मनोरंजनसृष्टी गाजवली. संपूर्ण जगभरात त्यांचे चाहते आहेत. गेली अनेक वर्ष अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. अमिताभ बच्चन म्हणजे प्रत्येकाचे जीव की प्राण. परंतु एकदा कोमामध्ये असलेल्या त्यांच्या एका चाहतीला त्यांना भेटण्याची आस लागली होती. त्या चाहतीने अन्न पाणीही सोडले होते, ही गोष्ट अमिताभ बच्चन यांना कळताच त्यांनी जे केले ते सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणणारे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : राखी सावंतचा MeToo चे आरोप असलेल्या साजिद खानला पाठिंबा; म्हणाली, “आरोप करणारे…”

१९८० साली ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला होता. अमिताभ बच्चन यांची एक चाहती मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. त्यांची तब्येत अतिशय गंभीर होती. त्यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत ‘अमर अकबर अँथनी’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या ‘अँथनी’ या व्यक्तीरेखेचं नाव घेत होती. हळूहळू तिच्या तब्येतीत सुधारणा होत ती शुद्धीवर आली, परंतु ‘अँथनी’ या नावाचा ध्यास तिने सुरुच ठेवला होता. त्यांना भेटण्यासाठी तिने अन्न पाणीही सोडले होते.

जेव्हा ‘अँथनी’ म्हणजे अमिताभ बच्चन यांचे नाव ती मुलगी घेत आहे ही बाब जेव्हा तेथील डॉक्टरांना कळली, तेव्हा त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी संपर्क साधला आणि याबद्दल माहिती दिली. अमिताभ बच्चन जोपर्यंत तिला भरवत नाहीत तोपर्यंत अन्नाकडे ती बघणार नाही, असा निश्चय तिने केल्याने डॉक्टरांनी अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात बोलावून घेतले. हा सगळा प्रकार ऐकून अमिताभ बच्चन यांना धक्का बसला. आपल्या कामाचा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर इतका परिणाम होईल असा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. अखेर अमिताभ बच्चन तेथे गेले आणि त्यांनी त्या चाहतीची भेट घेतली.

हेही वाचा : Photos : …अन् अमिताभ बच्चन यांच्या नावामुळे इराणमध्ये सुधा मूर्तींना मिळाली होती मोफत सेवा; स्वत:च सांगितला किस्सा

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक याबरोबरच अँग्री यंग मॅन म्हणूनही ओळखले जाते. ७० ते ८० च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीत १८० हून अधिक चित्रपटात भूमिका साकारल्या. आजही काम करतानाची त्यांची ऊर्जा अनेकांना प्रेरणा देते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When a fan kept mumbling amitabh bachchans name in coma rnv
Show comments