एखाद्या चित्रपटासाठी अमूक कलाकार निर्मात्यांची पहिली पसंती होता, पण त्याने नकार दिल्याने दुसऱ्याची वर्णी लागली, अशा गोष्टी आपण बॉलीवूडबद्दल बऱ्याचदा ऐकतो. एक ताजं उदाहरण घ्यायचं झाल्यास नुकत्याच एका मुलाखतीत रणवीर सिंहने खुलासा केला होता की ‘रामलीला’ चित्रपटात लीलाच्या भूमिकेसाठी करीना कपूरला घेण्यात आलं होतं, पण तिने ऐनवेळी सिनेमा सोडला आणि तिच्याजागी दीपिका पदुकोणला संधी देण्यात आली होती.

करिअरमध्ये तब्बल १८० फ्लॉप चित्रपट देऊनही ‘हा’ अभिनेता कसा बनला स्टार? एका वर्षी केलेले सलग ३३ फ्लॉप सिनेमे

२४ वर्षांपूर्वी आलेल्या एका सुपरहिट चित्रपटाच्या बाबतीतही असंच घडलं. पण यावेळी एक-दोन नाही तर तब्बल पाच अभिनेत्यांनी चित्रपटातील एक भूमिका करण्यास नकार दिला होता आणि अखेर सहाव्या अभिनेत्याने ती भूमिका स्वीकारली. भूमिका स्वीकारणारा अभिनेता होता अजय देवगण आणि त्या चित्रपटाचं नाव होतं ‘हम दिल दे चुके सनम’. या चित्रपटातील अजयच्या भूमिकेसाठी निर्माते संजय लीला भन्साळी यांनी आघाडीच्या पाच अभिनेत्यांशी संपर्क केला होता, पण सर्वांनी नकार दिला होता.

१७ वर्षांचा भाऊ गमावला, उदरनिर्वाहासाठी शेंगदाणे विकले; ३३ वर्षे चाळीत राहणाऱ्या अभिनेत्याने सांगितल्या जुन्या आठवणी

सलमान खान व ऐश्वर्या रायची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात अजय देवगणने ऐश्वर्याचा पती वनराजची भूमिका केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, संजय दत्त आणि अनिल कपूर यांना ही भूमिका ऑफर करण्यात आली होती. या सर्व कलाकारांनी विविध कारणांमुळे ऑफर नाकारली आणि शेवटी संजय लीला भन्साळींनी अजय देवगणशी संपर्क साधला. अजयने ही भूमिका आनंदाने स्वीकारली होती. ‘डीएनए’ने याबद्दल वृत्त दिलंय.

hum dil de chuke sanam
हम दिल दे चुके सनम चित्रपटातील सीन (फोटो – स्क्रीनशॉट्स)

हा चित्रपट अवघ्या १६ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. पण यातील कलाकारांचा अभिनय आणि चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप आवडली आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्या काळी या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर तब्बल ५२ कोटी रुपये कमावले होते. अनेक कलाकारांनी नाकारलेल्या या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी आणि सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन या विभागांमध्ये चार राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. २४ वर्षांनंतरही या सिनेमाची तितकीच चर्चा होताना दिसते. या चित्रपटानंतर ऐश्वर्या व सलमान एकमेकांच्या प्रेमात पडले होते, असं म्हटलं जातं.

Story img Loader