बॉलीवूडमध्ये आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान या तीन कलाकारांची कायम दबदबा असतो. ९० च्या दशकापासून या तीन अभिनेत्यांच्या चित्रपटांना चाहत्यांनी प्रचंड पसंती दिली आहे. शाहरुख ‘किंग खान’, सलमान ‘भाईजान’ म्हणून, तर आमिर खानने ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

हेही वाचा : सौरव गांगुलीच्या बायोपिकची चर्चा; आता रणबीर कपूरऐवजी ‘या’ अभिनेत्याची लागू शकते वर्णी!

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर
yograj singh criticise aamir khan movie
आमिर खानच्या ‘त्या’ सिनेमाला युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटले ‘अतिशय फालतू’; बॉलीवूड सिनेमांवरही केली टीका, म्हणाले…
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”

बॉलीवूडमध्ये या तिघांची मैत्री आणि त्यांच्यामधील भांडणाबाबत कायम चर्चा रंगताना दिसते. सध्या आमिर खानचा असाच एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये मलायका अरोरा आमिरला प्रश्न विचारताना दिसत आहे. मलायका आमिरला विचारते, तू एका बोटीत सलमान-शाहरुखसह अडकलास आणि तुला त्या दोघांपैकी एकालाच जागा द्यायची असेल तर तू बोटीच्या बाहेर कोणाला काढशील आणि बोटीवर राहण्यासाठी कोणाची निवड करशील? यावर आमिर खानने थोडा विचार करून, “मी सलमान खानला बाहेर काढेन आणि शाहरुखला जागा देईन,” असे उत्तर दिले. पुढे लगेचच तो म्हणाला, सलमानला बाहेर काढेन, कारण “भाई तो कभी डूबेंगे नही…” आमिरने दिलेले उत्तर ऐकून करण आणि मलायकाने “तू चांगले उत्तर दिलेस…” असे म्हणत त्याचे कौतुक केले.

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या कमाईत घसरण; २५ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमावले फक्त ‘इतके’ कोटी

आमिर खानचा हा जुना व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी सुद्धा त्याने दिलेल्या उत्तराचे कौतुक केले आहे. दरम्यान, आमिर खानच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नव्हती. याउलट चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलेल्या शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. ‘पठाण’मध्ये शाहरुख-सलमानने अनेक वर्षांनी एकत्र काम केले असून यामधील सलमानच्या कॅमिओला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Story img Loader