बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद खान सध्या त्याच्या पहिल्या चित्रपटामुळे चर्चत आहे. त्याने ‘महाराज’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे, लवकरच त्याचे इतर चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशातच आमिरचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तो मुलगा जुनैदचं नाव कोणी सुचवलं आणि त्या नावाचा अर्थ काय हे सांगताना दिसतो.

आमिर खानची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे, त्यात आमिर त्याच्या मुलाच्या नावाचा अर्थ सांगताना दिसतो. “माझ्या मुलाचं नाव ‘जुनैद’ सर्वात आधी माझी लहान बहीण फरहत खान हिने सुचवलं होतं. तिनेच त्याचं नाव जुनैद ठेवलं. माझे आई-वडील खूप आनंदी आहेत, कारण जुनैद त्यांचा पहिला नातू आहे. घरात सर्वजण खूप खूश आहेत. मीदेखील खूप आनंदी आहे,” असं या व्हिडीओत आमिर म्हणताना दिसतो.

mudassar khan riya kishanchandani welcome baby girl
Video: वर्षभरापूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न, सलमान खानचा जवळचा मित्र झाला बाबा; पत्नीने मुलीला दिला जन्म
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
abhijeet bhattacharya shah rukh khan
शाहरुख खानला ‘या’ नावाने चिडवायचे इतर अभिनेते, अभिजीत भट्टाचार्य यांनी केला खुलासा; म्हणाले, “दुबईतील पुरस्कार सोहळ्यात…”
Bollywood Actress Marathi Film Debut
सलमान खानच्या शोमुळे लोकप्रिय झाली; ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री आता मराठीत पदार्पण करणार! पहिली झलक आली समोर
Atul Parchure
“जायच्या अगदी दोन महिन्यांआधी मला फोन करून …”, मिलिंद गवळींनी सांगितली अतुल परचुरेंची आठवण; म्हणाले, “फारच वाईट…”
Amit Shah Controversy
“अमित शाहांनी राजीनामा द्यावा”, डॉ. आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यानंतर खरगेंची मागणी; काँग्रेसचं संसदेबाहेर आंदोलन; मोदींकडून बचाव
Azam Khan
Azam Khan : आझम खान यांचं तुरुंगातून एक पत्र अन् सपा-काँग्रेस संबंधाला ग्रहण? पत्रात कोणता राजकीय बॉम्ब फोडला?
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”

Maharaj Review : वादात अडकलेला ‘महाराज’ कसा आहे? आमिर खानच्या मुलाचा पदार्पणाचा चित्रपट पाहावा की नाही? वाचा

आमिरने नंतर मुलाच्या नावाचा अर्थही सांगितला. “त्याच्या नावाबद्दल खूप चर्चा झाली. खूप महिने आम्ही चांगलं नाव शोधत होतो आणि अखेर हे नाव ठेवायचं ठरलं. हे नाव आम्हा सर्वांना खूप आवडलं होतं. जुनैदचा अर्थ ‘योद्धा’ असा होतो. हा अरबी शब्द आहे. जुनैदमधील ‘Jun’ चा अर्थ भाला होतो. युद्धामध्ये अगदी सर्वात समोर भाला घेऊन उभा असलेला सैनिक म्हणजे जुनैद होय,” असं आमिर म्हणतो.

“मला माहित आहे की माझ्यात…”, पदार्पणाच्या ‘महाराज’ चित्रपटात स्वतःच्या कामाचा आमिर खानच्या मुलाने केला रिव्ह्यू

जुनैद हा आमिर खान आणि रीना दत्ताचा मोठा मुलगा आहे. त्यांना आयरा खान नावाची मुलगी असून तिचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं. १६ वर्षांच्या संसारानंतर आमिर व रीना यांनी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर आमिरने दिग्दर्शिका किरण रावशी दुससरं लग्न केलं. दुसऱ्या लग्नापासून आमिरला आझाद नावाचा मुलगा आहे. पण लग्नाच्या १५ वर्षानंतर आमिर व किरण यांचाही घटस्फोट झाला. दोघेही एकत्र आझादच्या जबाबदाऱ्या पार पाडतात.

२५० कोटींचे कर्ज फेडण्यासाठी विकलं ऑफिस? आमदार धिरज देशमुखांचे सासरे म्हणाले, “मी गेल्या ३० वर्षांपासून…”

जुनैद खानचा पहिला चित्रपट ‘महाराज’ २१ जून रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात जुनैदने समाजसुधारक करसनदास मुळजी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात जयदीप अहलावत, शर्वरी वाघ, शालिनी पांडे यांच्याही भूमिका आहेत. दुसरीकडे, आमिर शेवटचा ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटात दिसला होता. यानंतर त्याने काही काळ कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेतला होता. आता तो लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात झळकणार आहे.

Story img Loader