बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. यापैकी जण उत्तम यश मिळवून आजही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत, तर अनेकांनी अचानक इंडस्ट्री सोडली. यातील एक नाव म्हणजे ‘आशिकी’ फेम अभिनेता. आम्ही राहुल रॉयबद्दल नाही तर दीपक तिजोरी बद्दल बोलतोय. आज त्यांचा ६२ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी सांगत आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्न ठरलं, पत्रिका छापल्या अन् अचानक ‘अंगूरी भाभी’ने मोडलेलं लग्न; शिल्पा आजही अविवाहीत, पण ‘त्या’ अभिनेत्याने…

दीपक तिजोरींनी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले. त्यांनी ‘नशा’, ‘गुलाम’ आणि ‘जो जीता वही सिकंदर’ सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यांनी आयुष्यात खूप चढ-उतार पाहिले आहेत. त्याची फिल्मी कारकीर्दही काही खास राहिली नाही. तसेच वैयक्तिक आयुष्यही फारसे चांगले राहिले नाही. त्यांचं लग्न झालं होतं, पण त्या लग्नात त्यांची फसवणूक झाली होती. त्यांनी शिवानी तोमर नावाच्या फॅशन डिझायनरशी लग्न केलं होतं. या लग्नापासून त्यांना समारा तिजोरी ही मुलगी आहे.

आशिष विद्यार्थी नव्हे तर त्यांच्या पहिल्या पत्नीनेच घेतलेला घटस्फोट; स्वतः कारण सांगत म्हणाल्या, “एकेदिवशी माझ्या…”

२०१७ मध्ये दीपक यांना पत्नीचे योग शिक्षकाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आला होता. त्यानंतर पत्नीने त्यांना घरातून हाकलून दिलं होतं. दीपक यांना तिच्यावर कारवाई करायची होती. त्यामुळे ते वकिलाकडे गेले, यानंतर त्यांना जी माहिती मिळाली, ती ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. दीपक जिला त्यांची पत्नी मानत होते, खरं तर ती त्याची बायकोच नव्हती. तिचं आधीच लग्न झालं होतं. शिवानी पहिल्या पतीला घटस्फोट न देता दीपक यांच्याशी लग्न केलं आणि बरीच वर्षे त्यांच्यासोबत राहिली.

“दोघांचं लव्ह मॅरेज होतं, पण दुर्दैवाने…”, पालकांच्या लग्नाबद्दल लेक गश्मीर महाजनीचा खुलासा

दीपक तिजोरी मधल्या काळात चित्रपटृष्टीत सक्रिय नव्हते, पण आता ते पुन्हा अभिनय करू लागले आहेत. यापूर्वी त्यांनी ५० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्यांची व आमिर खानची खूप चांगली मैत्री आहे. दोघांनी ‘जो जीता वो सिकंदर’ आणि ‘गुलाम’ सारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. दरम्यान, दीपक यांची मुलगी समारा बॉलीवूडमध्ये अभिनेत्री आणि दिग्दर्शक म्हणून काम करते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When aashiqui fame deepak tijori wife shivani tomar cheated him she threw him out of home hrc