ऐश्वर्या राय १९९४ मध्ये मिस वर्ल्ड झाली होती. त्यानंतर तीन वर्षांनी तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. २७ वर्षांपूर्वी सिनेक्षेत्रात पदार्पण केलं होतं. १९९७ मध्ये आलेला मणि रत्नम यांचा ‘इरुवर’ हा तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. ऐश्वर्याने आपल्या करिअरमध्ये फक्त हिंदीच नव्हे तर दाक्षिणात्य व हॉलीवूड चित्रपटही केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या सौंदर्याने व अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या ऐश्वर्याला अनेक चित्रपटांमधून कारण न सांगता काढून टाकण्यात आलं होतं. त्यावेळी तिने एका मुलाखतीत फिल्म इंडस्ट्रीची तुलना खेकड्यांशी केली होती. सिमी गरेवालने मुलाखतीत तिला इंडस्ट्रीतील कोणत्या गोष्टीमुळे त्रास होतो, असं विचारलं होतं. त्यावर तिने काय उत्तर दिलेलं, ते जाणून घेऊयात.

हेही वाचा – ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”

ऐश्वर्या रायने काय म्हटलं होतं?

प्रश्न ऐकताच ती हसली आणि म्हणाली, “आता माझ्याकडे बोलायची संधी आहे.” ती पुढे म्हणाली, “मला माहीत नाही की हे फक्त याच इंडस्ट्रीचं वास्तव आहे की नाही, कारण हे एक सामान्य वक्तव्य आहे. परंतु इंडस्ट्रीची मानसिकता ही खेकड्यासारखी आहे. सर्व खेकडे टोपलीत आहेत आणि त्यापैकी एक सर्व त्रास सहन करून, संघर्ष करून त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी आणि मदत करण्याऐवजी ते फक्त त्याला मागे ओढतात आणि म्हणतात, ‘आमच्याबरोबरच राहा, इथेच आमच्याबरोबर पडून राहा, तू कुठेच जायचं नाही’. आणि ही वाईट वृत्ती आहे,” असं ऐश्वर्या रायने म्हटलं होतं.

हेही वाचा – ‘वन नाईट स्टँड’साठी मद्यधुंद अवस्थेत पार्टीत शिरली, नशेतच त्याच्या कुटुंबाला…; कपूर कुटुंबाच्या सूनेने सांगितली लव्ह स्टोरी

ऐश्वर्याला अनेक चित्रपटांमधून काढलं होतं

ऐश्वर्या राय काही वर्षांनंतर पुन्हा सिमी गरेवालच्या शोमध्ये झळकली होती. त्यावेळी शाहरुख खानबरोबरच्या करत असलेल्या पाच सिनेमांमधून तिला का काढून टाकण्यात आलं, याबद्दल अभिनेत्रीने खुलासा केला होता. ‘वीर जारा’ हा चित्रपट ऐश्वर्यासाठीच लिहिला होता, असं सिमी गरेवालने म्हटलं. त्यावर ऐश्वर्या म्हणाली लोकांना कारण विचारणं माझ्या स्वभावात नाही. जर त्यांना (निर्मात्यांना) स्पष्टीकरण द्यायचे असते तर त्यांनी दिले असते, असे ऐश्वर्या म्हणाली होती.

ऐश्वरा राय सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या व तिचा पती अभिषेक बच्चनच्या नात्यात दुरावा आला आहे, असं म्हटलं जात आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात अभिषेक बच्चन कुटुंबाबरोबर आला होता; तर ऐश्वर्या त्याच ठिकाणी काही वेळाने लेक आराध्याबरोबर आली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When aishwarya rai bachchan called film industry crab mentality hrc