When Aishwarya Rai Bachchan on doing kissing scenes: आपल्या सौंदर्याने व अभिनयाने प्रेक्षकाने घायाळ करणाऱ्या ऐश्वर्या रायने स्क्रीनवर इंटिमेट सीनही केले आहे. तिने २०१६ मध्ये आलेल्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटात रणबीर कपूरबरोबर रोमँटिक सीन केले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने फिल्मफेअरला मुलाखत दिली होती. त्यावेळी तिला इंटिमेट सीनबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी तिने काय प्रतिक्रिया दिली होती, ते पाहुयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“चलते चलतेनंतर अचानक मला इथे काम मिळणं कमी झालं आणि पाश्चिमात्य देशांतून ऑफर येऊ लागल्या. तेव्हा मी स्वतःला वचन दिले की माझं भविष्य कोणीही ठरवणार नाही. मला एक ऑफर आली होती, त्याच्या स्क्रिप्टमध्ये एक किसिंग सीन होता. पण मी दिग्दर्शकाला म्हणाले की आपण हा सीन टाळू शकतो, कारण हा सीन कथानकासाठी इतका महत्त्वाचा नाही. त्याच काळात मी शब्द सिनेमा केला. त्यात किसिंग सीन नव्हता पण त्यात इंटिमसी दाखवण्यात आली होती. जिथे थेट संपर्क नसेल असे इंटिमेट सीन करण्यात माझी हकत नव्हती. कारण माझ्याबरोबरच्या किसिंग सीनची किती चर्चा होईल याची कल्पना मला होती,” असं ऐश्वर्या राय म्हणाली होती.

Video: “बांगड्या घाल म्हणजे काय?” जान्हवीच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला रितेश देशमुख; घरातून बाहेर काढण्याची दिली धमकी

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (फोटो – इन्स्टाग्राम)

हृतिकसोबतच्या किसिंग सीनबद्दल ऐश्वर्या म्हणालेली…

“माझ्या करिअरच्या १० वर्षांनी धूम आला होता आणि तोपर्यंत चित्रपटातील किसिंग सीन ही गोष्ट लोकांच्या परिचयाची झाली होती. त्यामुळे बदलत्या काळानुसार काय प्रेक्षकांना धक्का देणारं आहे आणि काय नाही याचा विचार तुम्ही जबाबदारीच्या भावनेने करू शकता. सोशल व व्हिज्युअल कम्फर्ट काळानुसार बदलत असतात. जेव्हा मी धूममध्ये किसिंग सीन केला तेव्हा आम्ही इतर सामान्य सीनप्रमाणेच हाताळायचं ठरवलं होतं. कारण त्या किसिंग सीनबरोबर एक डायलॉगही होता. फक्त म्युझिक व किस असा तो सीन नव्हता, मी व हृतिक एकमेकांशी रोमान्स करत नव्हतो,” असं मुलाखतीत ऐश्वर्या राय म्हणाली होती.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रायचा ‘तो’ व्हिडीओ आला समोर, लेक आराध्याचीही दिसली झलक

२०१२ मध्ये डेली मेलशी बोलताना ऐश्वर्या म्हणाली होती, “जेव्हा मी तो किसिंग सीन केला तेव्हा मला अनेक कायदेशीर नोटिसा आल्या होत्या. लोक म्हणायचे की तू आमच्या मुलींसाठी एक आदर्श आहेस, त्यामुळे तुला असे सीन्स करताना बघून त्यांना चांगलं वाटत नाही”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When aishwarya rai reacted on doing intimate kissing scenes hrithik roshan dhoom hrc