ऐश्वर्या रायला जवळपास दोन दशकांपूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘देवदास’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हॉलीवूडमध्येही ऐश्वर्याची चर्चा होती. याच काळात तिला ब्रॅड पिटच्या ‘ट्रॉय’ चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. मात्र, तरीही तिने तो सिनेमा करण्यास नकार दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्या रायला ब्रॅड पिटच्या ट्रॉय नावाच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली होती, पण त्यासाठी तिला तिथे राहून ६ ते ९ महिने त्या चित्रपटासाठी शूटिंग करावं लागणार होतं. एवढी चांगली ऑफर ऐश्वर्याने नाकारली होती, कारण तिने काही बॉलीवूड चित्रपट स्वीकारले होते. त्यामुळे तिला आपली कमिटमेंट मोडायची नव्हती. हा चित्रपट नाकारला असला तरी नंतर ऐश्वर्या राय ‘ब्राइड अँड प्रिज्युडिस’ आणि ‘पिंक पार्टनर 2’ सारख्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसली होती.

हेही वाचा – ऐश्वर्या राय बच्चनचे इन्स्टाग्रामवर १४.३ मिलियन फॉलोअर्स, ती फक्त ‘या’ एकाच व्यक्तीला करते फॉलो

‘स्क्रीन’शी बोलताना ऐश्वर्याने या ऑफरबद्दल सांगितलं होतं. ती म्हणाली होती की निर्मात्यांनी तिला या चित्रपटासाठी ६ ते ९ महिने द्यावे लागतील असं म्हटलं होतं. मात्र, त्या तुलनेत तिची भूमिका महत्त्वाची असली तरी इतका वेळ देण्याइतकी मोठी नव्हती. हॉलीवूडचं काम कसं असतं हे त्यावेळी माहीत नव्हतं, असंही तिने सांगितलं होतं. “मी ६ ते ९ महिने त्यांच्या चित्रपटासाठी द्यावे, अशी त्यांची इच्छा होती कारण हा एक मोठा चित्रपट होता,” असं ती म्हणाली होती.

हेही वाचा – ‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी

“ऑफर आल्यावर तुम्ही साहजिकच सगळा विचार करता. तुमची भूमिका काय, तुम्हाला त्यासाठी किती दिवस द्यायचे आहेत या सगळ्या गोष्टी. सिनेमा मोठा होता तरी मी ज्या लहान चित्रपटांसाठी होकार दिले होते ते मी सोडू शकले नव्हते,” असं ऐश्वर्या राय म्हणाली होती.

ब्रॅड पिट काय म्हणाला होता?

ब्रॅड पिटने २०१२ मध्ये याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. त्याला ‘ट्रॉय’मध्ये ऐश्वर्याला घ्यायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. “संधी मिळाल्यास, मला ऐश्वर्या राय बच्चनबरोबर काम करायला आवडेल, कारण ती एक अष्टपैलू अभिनेत्री आहे. ती बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची स्टाइल, सौंदर्य आणि अभिनयासाठी पाश्चिमात्य देशांमध्येही तिचं कौतुक होतं. मला वाटतं की आम्ही ‘ट्रॉय’मध्ये एकत्र काम करण्याची संधी गमावली,” असं तो आयएएनएसला म्हणाला होता. नंतर ऐश्वर्याने नाकारलेली भूमिका रोज बायर्नने केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When aishwarya rai refused to do hollywood film with brad pitt because of her promises in india hrc