‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोणच्या बिकिनीवरून चांगलाच वाद पेटला आहे. यावरून काही जण दीपिकाला पाठिंबा देत आहेत, तर काही जण विरोध करत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचं जुनं वक्तव्य चर्चेत आलं आहे. १९९४ मध्ये तिने ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी तिने बिकिनी परिधान करणं कंफर्टेबल वाटत नसल्याचं म्हटलं होतं. तिने आयोजकांनाही त्याबद्दल सांगितलं होतं. पुढे जवळपास २० वर्षांनी म्हणजेच २०१५मध्ये आयोजकांनी या स्पर्धेतून स्विमवेअर फेरी कायमची रद्द केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“बॉयकॉट करण्यापेक्षा…” ‘पठाण’मधील बिकिनी वादावर नवनीत राणांचे स्पष्ट विधान

एका मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले होते की ती फक्त स्वतःचं एकटीच मत मांडत नव्हती, इतर स्पर्धकांच्या वतीनेही बोलत होती. कारण त्यांच्याही भावना समान होत्या. “१९९४ मधील माझ्या स्पर्धेनंतर, १९९५ मध्ये बिकिनी फेरी रद्द करण्यात आली होती. तेव्हाही मी आयोजकांकडे माझं मत व्यक्त केलं होतं. कारण आमच्यापैकी काही वेगवेगळ्या देशातील स्पर्धकांना त्यांच्या देशातील संस्कृती आणि बंधनांमुळे रॅम्पवर बिकिनी घालणं आरामदायी नव्हतं. मी फक्त माझ्यासाठीच बोलत नव्हते, तर स्विमवेअर फेरी आवश्यक नसलेल्या देशांतील अनेक मुलींसाठी बोलत होते,” असं ऐश्वर्या म्हणाली होती.

दीपिका पदुकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर शाहरुख खानचा लूक भारी, लाखो रुपयांचा खर्च, शूजची किंमत आहे…

पुढे ती म्हणाली, “मी त्यावेळी बोलल्यानंतर खरं तर पुढच्या तीन वर्षांसाठी त्यांनी स्विमवेअर फेरी रद्द केली आणि बीच वेअर फॅशन शो केला. हे एका सामान्य फॅशन राउंडप्रमाणे करण्यात आलं होतं आणि त्याचा मला खूप आनंद झाला होता.” या मुलाखतीत ऐश्वर्याने आपली परफेक्ट बीच बॉडी नसल्याचंही म्हटल होतं. “जेव्हा मी मिस वर्ल्ड बनले, तेव्हा माझी परफेक्ट बीच बॉडी नव्हती आणि मी हे रेकॉर्डवर म्हणू शकते. माझ्यासह त्या स्पर्धेत इतर ८७ स्पर्धक होते आणि त्यांची बॉडी माझ्यापेक्षा चांगली होती,” असं ऐश्वर्या म्हणाली होती.

दरम्यान, २०१४ मध्ये मिस वर्ल्डच्या चेअरवुमन ज्युलिया मॉर्ले यांनी एले मासिकाशी संवाद साधताना म्हणाल्या होत्या, “बिकिनी परिधान करून खाली-वर बघत स्टेजवर येणाऱ्या महिला महिला खरोखरच बघायच्या नाहीत. हे बघणाऱ्यांसाठी किंवा त्या स्पर्धकांसाठीही कोणत्याच कामाचं नाही.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When aishwarya rai spoke against bikini round in miss world pageant cancelled it next year amid pathaan controversy hrc