टीप टीप बरसा या गाण्याने नव्व्दसच्या दशकात खळबळ माजवली होती. या गाण्यातील अक्षय कुमार, रवीना टंडनच्या केमीस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. त्यावेळी या दोघांच्या अफेअरची खूप चर्चा झाली होती. दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि साखरपुडाही केला होता. पण लग्नापूर्वीच त्यांचा साखरपुडा मोडला होता. नुकतेच अभिनेत्रीने यावर भाष्य केले आहे. अक्षयच्याबरोबरीने तिचे आणखीन एका अभिनेत्याशी नाव जोडले गेले होते.
बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अर्थात अजय देवगणबरोबर रवीनाचे अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या दोघांनी १९९४ साली दिलवाले चित्रपटात काम केले होते. अजय देवगणने फिल्मफेअर मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रवीनावर भाष्य केलं होत तो असं म्हणाला होता,” रवीना टंडन संपूर्ण इंडस्ट्रीतील सर्वात मोठी खोटारडी आहे. तिला एका चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाला भेटण्याची गरज आहे. मी तिचे बिनबुडाचे आरोप सहन करत आहे. मी जर तिची गुपितं उघड केली तर रवीना कोणाचा चेहरा बघू शकणार नाही.”
“तिने पहिल्या पतीबरोबर…” नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वकिलांनी अभिनेत्याच्या पत्नीवर केले खळबळजनक आरोप
रवीनाने त्याकाळात अजय देवगणवर आरोप केले होते की त्याने मला फसवले आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की रवीना तेव्हा नैराश्याचा सामना करीत होती. तीच म्हणणे होते कि अजयने मला फसवले आणि तो आता करिष्मा कपूरला डेट करत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दिवसांत अजय देवगण, रवीना टंडन आणि करिश्मा कपूर एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होते.
९० च्या दशकात चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रवीना टंडन आजही चांगलीच चर्चेत असते. त्या काळातील ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये रवीनाचं नाव हमखास घेतलं जायचं. आताही काही चित्रपट आणि वेबसीरिजमधून रवीनाने उत्तम काम करत स्वतःला पुन्हा सिद्ध केलं आहे.