९० च्या दशकात चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रवीना टंडन आजही चांगलीच चर्चेत असते. ९० च्या दशकातील काही ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये रवीनाचं नाव घेतलं जायचं. आताही काही चित्रपट आणि वेबसीरिजमधून रवीनाने उत्तम काम करत स्वतःला पुन्हा सिद्ध केलं आहे. चित्रपटाबरोबरच रवीनाच्या खासगी आयुष्याबद्दलही बरीच चर्चा झाली. अक्षय कुमारबरोबर रवीनाच्या नात्याची चांगलीच चर्चा झाली.

अक्षयनंतर रवीनाचं नाव अजय देवगणशीही जोडलं गेलं होतं. अजय देवगण आणि रवीना टंडन यांची जोडी ‘दिलवाले’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली. प्रेक्षकांना यांची जोडी खूप भावली. नंतर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चासुद्धा होत होती. मध्यंतरी रवीना टंडनने एका मुलाखतीमध्ये याबद्दल खुलासाही केला होता. अजय आणि रवीना दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याचा दावा तिने केला होता. इतकंच नव्हे तर अजयने तिला प्रेमपत्रंसुद्धा लिहिली असल्याचं रवीनाने स्पष्ट केलं होतं.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”

आणखी वाचा : ‘कभी अलविदा ना केहना’मधील सेक्स सीनवरुन करण जोहर आदित्य चोप्राशी भांडला होता; दिग्दर्शकाने केला खुलासा

रवीनाच्या या दाव्यामुळेच तिच्यात आणि अजय देवगणमध्ये खटके उडाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर रवीनाच्या या वागण्याकडे एक पब्लिसिटी स्टंट म्हणून अजय देवगणने दुर्लक्ष केलं होतं. “ती खूप नाटकी आहे, याबरोबरच ती जन्मजात खोटारडी आहे” असं म्हणत तेव्हा अजय देवगणने हात झटकले होते.

रवीना ही अजयची बहीण निलमची मैत्रीण होती आणि त्यामुळेच तिचं घरी येणं जाणं होतं. याबरोबरच तेव्हा त्यांच्यात असं काहीच नसल्याचा खुलासा अजय देवगणने केला होता. सध्या हे दोघेही त्यांच्या त्यांच्या आयुष्यात खुश आहेत. अजय देवगणने अभिनेत्री काजोलबरोबर लग्न केलं आणि रवीनानेसुद्धा उद्योगपती अनिल थडानीबरोबर संसार थाटला. नुकत्याच नेटफ्लिक्सच्या ‘अरण्यक’ या वेबसीरिजमधून रवीनाने ओटीटी विश्वात पदार्पण केलं.

Story img Loader