प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार मागच्या काही काळापासून सातत्याने त्याच्या फ्लॉप चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकलेले नाहीत. २०२४ मध्ये आलेले त्याचे तिन्ही चित्रपट फ्लॉप झाले. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘सरफिरा’ आणि ‘खेल खेल में’ हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळले. करिअरमध्ये आता सिनेमे फ्लॉप होत असले तरी अक्षय कुमारने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. त्याला त्याच्या कामासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.

अक्षय कुमारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक त्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत अक्षय कुमार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्याचा कसं अपमान झाल्यासारखं वाटलं होतं हे सांगताना दिसतोय. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्याचा अभिमान वाटत होता, मात्र त्यानंतर शेजारी येऊन एक अभिनेत्री बसली आणि तिच्याशी बोलताना अक्षय कुमारला कसं अपमानास्पद वाटलं ते तो या व्हिडीओत सांगतो.

हेही वाचा – “मी स्पष्टीकरण देण्यासाठी जन्मलेले नाही”, निक्की तांबोळीचे वर्षा उसगांवकरांबद्दल स्पष्ट वक्तव्य; म्हणाली, “त्यांचे पाय धरून…”

अक्षय कुमारला २०१६ मध्ये आलेल्या ‘रुस्तम’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर २०१८ मध्ये ‘पॅडमॅन’ चित्रपटासाठी त्याला पुरस्कार देण्यात आला होता.

अक्षय कुमार म्हणाला, “राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात माझा कसा अपमान झाला ते मी तुम्हाला सांगतो. मी बसलो होतो तेवढ्यात एक मुलगी माझ्या जवळ आली आणि ती तिथे बसली. तिने मला सांगितलं की ती माझी खूप मोठी चाहती आहे. ती मल्याळम अभिनेत्री होती. त्यावेळी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहे याचा मला खूप अभिमान वाटत होता. तेवढ्यात तिने मला विचारले की तुम्ही किती चित्रपट केले आहेत? मी तिला उत्तर दिलं की मी जवळपास १३५ चित्रपट केले आहेत. मग मी तिला विचारलं की तू किती चित्रपट केले आहेस? तेव्हा ती म्हणाली, “सर, हा माझा पहिला चित्रपट होता.” मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तिने एकच चित्रपट केला आणि त्या पहिल्या चित्रपटासाठीच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर मी काय बोलू”.

हेही वाचा – Video: बिश्नोई गँगकडून धमक्या अन् बिग बॉस १८चे शूटिंग; सलमान खान स्पष्टच म्हणाला, “कसम खुदा की…”

अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास तो रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ या कलाकारांची मांदियाळी आहे. यात अक्षय कुमारचा कॅमिओ आहे.

Story img Loader