ज्यांच्या आवाजाने प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात, लक्ष देऊन ऐकतात तो आवाज म्हणजे अमिताभ बच्चन. चित्रपट असो किंवा कौन बनेगा करोडपती अमिताभ बच्चन आपल्या दमदार आवाजात संवाद म्हणत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. दमदार आवाजही देणगी लाभलेल्या अमिताभ बच्चन यांना आपल्याच आवाजाबद्दल शंका निर्माण झाली होती. त्यांनी आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाला आवाज देण्यासाठी थोडे साशंक होते.
२००० दशकांच्या सुरवातीलाच आलेल्या आमिर खानच्या ‘लगान’ने थेट ऑस्करपर्यंत मजल मारली होती. या चित्रपटासाठी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी अथक प्रयत्न केले होते. या चित्रपटाला अनेकांनी नकार दिला होता. निर्माता मुख्य अभिनेता आमिर खाननेदेखील नकार दिला होता मात्र नंतर त्याला ही गोष्ट आवडू लागली आणि तो हा चित्रपट करण्यासाठी तयार झाला. आमिरला चित्रपटाची कथा सांगण्यासाठी एखाद्या आवाजाची गरज होती म्हणून तो अमिताभ बच्चन यांच्याकडे गेला मात्र त्यांनी आमिरला स्पष्ट सांगितले होते ‘मी ज्या चित्रपटांना आवाज दिला आहे ते चालले नाहीत’. मात्र आमिर ठाम होता आणि अखेर बच्चन यांनी त्यांचा आवाज चित्रपटाला दिला.
“देवावर विश्वास नसणारे…”; कांतारा स्टार रिषभ शेट्टीने सांगितला चित्रपटाच्या सेटवरचा ‘तो’ किस्सा
दरम्यान ‘लगान’ चित्रपटाची ही कथा काल्पनिक आहे. जी मध्य भारतीत एका गावाची कथा आहे. या चित्रपटात इंग्रजांनी कर माफ करावा यासाठी गावातील लोक क्रिकेट खेळण्याची पैज लावतात. क्रिकेटवर आधारित असलेला हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटाची लांबी खूप मोठी होती म्हणून टीकादेखील करण्यात आली होती.
या चित्रपटात आमिर खान, ग्रेसी सिंग मुख्य भूमिकेत होते तर कुलभूषण खरबंदा, रघुवीर यादव, राजेश विवेक, प्रदीप रावत, दया शंकर पांडे असे कलाकार एकत्र दिसले होते. चित्रपटाला ए आर रहमान यांनी संगीत दिले होते तर जावेद अख्तर यांनी चित्रपटाची गाणी लिहली होती. अनेक संकटांवर मात करत हा चित्रपट बनला होता.