बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन त्यांच्या खुमासदार अभिनयाने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करतात. एक सो एक हिट चित्रपट देऊन नवनवीन यशाची शिखरे गाठणाऱ्या अमिताभ बच्चन यांनाही आयुष्यात कठीण काळाला सामोरं जावं लागलं होतं. अमिताभ यांच्यावर ९० कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. अभिनेता परेश रावल यांन याबाबत एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परेश रावल यांनी नुकतीच ‘निलेश मिश्रा द इंटरव्ह्यू सीरिज’मध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, “९० कोटींच्या कर्जाचा डोंगर अमिताभ बच्चन यांच्यावर होऊ शकतो, याचा कोणी विचारही केला नसेल. तेव्हा ते कसे होते आणि आता ते कसे आहेत…ते एक उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्यांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे”.

हेही वाचा>> ‘दृश्यम २’ नंतर अजय देवगणच्या ‘सिंघम’ची चर्चा; चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

“जेव्हा गोष्टी फारच कठीण झाल्या होत्या तेव्हा कुटुंबियांना याची माहिती देण्याबाबत मी अमिताभ यांना सांगितलं होतं. तेव्हा ते “त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे” असं मला म्हणाले होते. त्यांना लोकांचे खूप पैसे परत करायचे होते. परंतु, त्यांच्या तोंडातून कधीच कोणाबद्दलही वाईट शब्द आले नाहीत. त्यांना कायद्याचा आधार घेत यातून सुटका करुन घेता आली असती. परंतु, त्यांनी सगळ्यांचे पैसे परत देण्याचा निर्णय घेतला. ही त्यांची मूल्ये आहेत. शेवटी ते हरिवंशराय बच्चन यांचे पुत्र आहेत”, असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा>> गरोदर असल्याच्या चर्चांवर मलायका अरोराने सोडलं मौन, म्हणाली…

१९९९ साली अमिताभ बच्चन यांची निर्माती कंपनी अमिताभ बच्चन कॉर्पोरेडेट लिमिटेडला फार मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर ९० कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. अनेक जण पैसे मागण्यासाठी त्यांच्या घरी यायचे. त्यांना शिवीगाळ करायचे याबाबत अमिताभ बच्चन यांनी मुलाखतीतही सांगितलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When amitabh bachchan paying back 90 cr to his lenders paresh rawal praises him kak