बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळावी, असं अनेकांचं स्वप्न असतं. पण दिग्दर्शक आर. बाल्की यांनी आपल्या पदार्पणाच्या चित्रपटात अमिताभ बच्चन यांना घेतलं होतं. मात्र हा चित्रपट करताना खूप अडचणी आल्या, असं बाल्की सांगतात. २००७ मध्ये आलेल्या ‘चीनी कम’ चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्याच अमिताभ बच्चन बाल्की यांच्यावर ओरडले होते.

‘चीनी कम’ हा चित्रपट लंडनमध्ये चित्रित केला होता. यात अमिताभ बच्चन यांनी एका वृद्ध, अहंकारी रेस्टॉरंटच्या मालकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांच्या पात्राचे नाव बुद्धदेव गुप्ता होते. आर बाल्की यांनी ‘चीनी कम’ चित्रपटाच्या शूटिंगच्या आठवणी सांगितल्या. चित्रपटाचा पहिलाच सीन शूट करताना त्यांनी बिग बींना रिटेकची विनंती केली, त्यामुळे ते चांगलेच चिडले आणि बाल्की यांच्यावर ओरडले. पहिलाच सीन शूट करताना हे घडलं. मात्र, त्या रिटेकमुळे अमिताभ बच्चन यांना त्यांचं पात्र समजण्यास मदत झाली, असं बाल्की यांनी सांगितलं.

हेही वाचा – ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”

“सिनेमात एक सीन आहे जिथे ते (अमिताभ बच्चन यांनी साकारलेले पात्र) सर्व शेफना कामावरून काढून टाकतात. ते सगळ्यांवर जोरात ओरडतात. मी तो सीन पाहिला, पण मला नेमकं काय अपेक्षित आहे ते त्यांना कसं सांगावं, हे मला कळत नव्हतं. दिग्दर्शक असलो तरी मी त्यांचा चाहता आहे. मी त्यांना विचारलं की आपण आणखी एक रिटेक घेऊ शकतो का? त्यांनी लगेच मला विचारलं, ‘पण का?’ मी म्हटलं, ‘थोडं कमी’ (अभिनय व हावभाव कमी करा) मात्र त्यांनी पुन्हा तसंच केलं. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हटलं की थोडं कमी. मग त्यांनी माझ्याकडे नजर रोखून पाहिलं, परत गेले आणि त्यांनी पुन्हा आधीप्रमाणेच सीन दिला,” असं बाल्की एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एका सेशनमध्ये म्हणाले.

हेही वाचा – ‘वन नाईट स्टँड’साठी मद्यधुंद अवस्थेत पार्टीत शिरली, नशेतच त्याच्या कुटुंबाला…; कपूर कुटुंबाच्या सूनेने सांगितली लव्ह स्टोरी

नेमकं काय घडलं होतं?

अमिताभ बच्चन चिडले, तेव्हा काय घडलं होतं, ते बाल्की यांनी सांगितलं. “त्या क्षणी, मी फक्त माझ्या कॅमेरामनकडे पाहत होतो. बच्चन म्हणाले, ‘सगळं ठीक आहे. चला पुढचा शॉट घेऊ’ आणि मी म्हटलं, ‘अमित जी, अजून एक रिटेक.’ ते चिडले आणि सर्वांसमोर माझ्यावर ओरडले; ‘यार, मी काय करावं असं तुला वाटतं? कोण आहेस तू? मी तिथे उभं राहून माझे हात न हलवता, चेहऱ्यावर हावभाव न आणता बोलावं अशी तुझी इच्छा आहे का?’ मी म्हणालो, ‘हो.’ मग ते आले, हात न हलवता, चेहऱ्यावर एकही भाव न आणता ते त्या माणसाला कामावरून काढतात. हा सीन झाल्यावर अमिताभ यांनी फक्त माझ्याकडे पाहिलं आणि तिथून निघून गेले. नंतर १० मिनिटांनी त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले, ‘मला चित्रपट समजला आहे.’ तर असा चित्रपटाच्या शूटिंगचा पहिला दिवस होता. चित्रपटाचा टोन काय आहे हे मला त्यांना समजावून सांगायचं होतं. आपल्या भावना व्यक्त न करू शकणाऱ्या व्यक्तीचं पात्र ते या सिनेमात साकारत होते,” असं बाल्की म्हणाले.

‘चीनी कम’मध्ये परेश रावल, जोहरा सेहगल आणि स्विनी खारा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट हिट ठरला होता. तसेच २००७ च्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्येही या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता.

Story img Loader