‘अब के बरस’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमृता राव आज ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘ईश्क विश्क’, ‘विवाह’सारख्या चित्रपटातून अमृताला ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ ही ओळख मिळाली. सध्या अमृता लाइमलाइटपासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ‘मैं हूं ना’सारख्या चित्रपटात अमृता शाहरुखसारख्या मोठ्या स्टारबरोबर झळकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमृताने एका जुन्या मुलाखतीमध्ये दिलेल्या एका धमाल उत्तरामुळे तिची चर्चा होत आहे. “कोणत्या हॉलीवूड अभिनेत्याला शर्टलेस बघायला आवडेल,” असा प्रश्न अमृताला एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला होता. या प्रश्नावर तिने दिलेल्या विचित्र उत्तराची तेव्हा चांगलीच चर्चा झाली होती.

आणखी वाचा : अजय देवगणचा ‘मैदान’ चित्रपट चक्क सातव्यांदा पुढे ढकलण्यात आला; नेमकं कारण काय?

‘झूम’ चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ‘रॅपिड फायर’मध्ये विचारलेल्या या प्रश्नाचं अमृताने अत्यंत मजेशीर असं उत्तर दिलं. तिने हॉलीवूड नव्हे तर बॉलीवूडमधील दोन कलाकारांची नावं घेतली होती. पहिलं नाव होतं कादर खान यांचं. अमृताने दिलेल्या या उत्तरावरून तिला या प्रश्नाचं गंभीर उत्तर द्यायचं नसल्याचं लक्षात आल्यावरही तिला पुन्हा एकदा याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा अमृताने कादर खानसह अभिनेता राजपाल यादवचंही नाव घेतलं होतं.

अमृताने सांगितलेल्या या दोन नावामुळे याबद्दल तेव्हा चांगलीच चर्चा रंगली होती. अमृताने ‘मस्ती’, ‘वेलकम टू सज्जनपुर’ अशा चित्रपटांतही काम केलं आहे. नंतर मात्र तिने अभिनयातून ब्रेक घेत आरजे अनमोलसह २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली. यानंतर २०१९ मध्ये आलेल्या ‘ठाकरे’ या चित्रपटातही अमृताने बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.